"अनेकदा शिंगावर घेऊन आपटलं तरी राणेंची खुमखुमी जात नाही"

हिंमत असेल, तर शिंगावर घ्या. वेळ आणि ठिकाण सांगा, अशा शब्दांत नारायण राणे यांनी त्यांच्या ‘प्रहार’ वृत्तपत्रामधून शिवसेना पक्षप्रमुख यांच्यावर हल्ला चढविला आहे
narayan rane vinayak raut
narayan rane vinayak rautsakal media
Updated on

नवी दिल्ली : नारायण राणे यांना आम्ही अनेकवेळा शिंगावरच घेतले नाही, तर जमिनीवर आपटले आहे. तरी त्यांची खुमखुमी जात नाही. आम्ही त्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही. शिवसैनिक त्यांची खोड मोडण्यास कधीही शिंगावर तयार आहे. ते केवळ कोल्हेकुई करतात, असा पलटवार शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला.

narayan rane vinayak raut
LAC वर तणाव, चीनला उत्तर देण्यासाठी लष्कराकडून 'बोफोर्स तोफा' तैनात

हिंमत असेल, तर शिंगावर घ्या. वेळ आणि ठिकाण सांगा, अशा शब्दांत नारायण राणे यांनी त्यांच्या ‘प्रहार’ वृत्तपत्रामधून शिवसेना पक्षप्रमुख यांच्यावर हल्ला चढविला आहे. याबाबत ‘सकाळ’शी बोलताना राऊत म्हणाले, ‘‘भाजपमधील आपले अस्तित्व आहे, हे दाखविण्यासाठी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करीत आहे. या पलिकडे राणे यांचे अस्तित्व शून्य आहे. आम्ही त्यांच्या टिकेला किंमत देत नाही आणि त्यांच्या धमक्यांना भिकही घालत नाही. त्यांची मुले असो की राणे यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही.’’

एमईपीविषयी तक्रार

विनायक राऊत रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आणि एमईपी या म्हैसकर यांच्या कंपनीबाबतही त्यांनी गडकरी यांच्याकडे तक्रार केली. त्याबाबत राऊत यांनी सांगितले, की मुंबई-गोवा महामार्गाचे काम नितीन गडकरी यांनी दिलेल्या निधीमुळे सुरू झालेले आहे. त्यात एमईपी या म्हैसकरांची कंपनी आहे, त्यांना ९२ किलोमीटर रस्त्याचे काम दिलेले आहे. ते रखडले असल्याने त्यांचे कंत्राट रद्द करून चांगल्या कंत्राटदाराला द्यावे, अशी विनंती गडकरी यांना केली आहे. या कंपनीचे जे काम स्थानिक ठेकेदारांनी केले आहे, त्यांचे २९ कोटी रुपये कंपनी देणे लागते. या पैशांअभावी ठेकेदार आर्थिक अडचणीत आहेत, त्यांना तातडीने त्यांची रक्कम मिळावी, अशी मागणीही केली आहे.

narayan rane vinayak raut
रुपाली चाकणकर अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे ईडी, सीबीआयचा यांच्या गैरवापराबद्दल टीका करीत आहेत. या यंत्रणांनी अनेक नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे, याबद्दल राऊत म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या दिवशी केंद्रीय यंत्रणांचा वापर लोकांना घाबवण्यासाठी करू नये, असे विधान केले. सुदैवाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्याला पुष्टी दिली आहे. या केंद्र शासनाच्या यंत्रणा लोकांना घाबरवण्यासाठी असता कामा नये, असे पतप्रधान म्हणाले. या निर्देशांचे पालन केंद्रीय यंत्रणांनी करावे.’’

"पंकजा मुंडे यांच्या पाठोपाठ माझी आणि नितीन गडकरी यांची भेट हा केवळ योगायोग आहे. त्याचा राजकीय अर्थ कुणीही काढू नये. मतदारसंघातील रस्ते विकास कामांसाठी आम्ही त्यांना भेट असतो. दिल्लीत मराठी खासदारांचे हक्काचे ठिकाण म्हणजे नितीन गडकरी यांचे निवासस्थान आहे."

- विनायक राऊत (खासदार, शिवसेना)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()