Honey Trap: परराष्ट्र मंत्रालयाच्या ड्रायव्हरला अटक; पाकिस्तानला द्यायचा गोपनीय माहिती

foreign ministry
foreign ministryesakal
Updated on

नवी दिल्लीः दिल्लीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. परराष्ट्र मंत्रालयामध्ये काम करणाऱ्या एका वाहन चालकाला पोलिसांनी आज अटक केलीय.

परराष्ट्र मंत्रालयामध्ये ड्रायव्हर असलेल्या या इसमाने गोपनीय आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिल्याचा दावा करण्यात येतोय. या व्यक्तिच्या अटकेसाठी पोलिसांनी सुरक्षा यंत्रणांची मदत घेतली.

हेही वाचाः का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

माहिती मिळतेय की, या ड्रायव्हरला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने हनी ट्रॅपमध्ये फसवलं होतं. त्यामुळे तो गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवत होता. 'न्यूज १८ हिंदी'ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

foreign ministry
Gau Raksha : आता 'गो रक्षणा'साठी पगारातून पैसे होणार कपात; भाजप सरकारचा मोठा निर्णय!

या चालकाच्या अटकेनंतर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयामध्ये काम करणारे इतरही लोक यामध्ये सहभागी आहेत का? याबाबत तपास सुरु झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयामध्ये काम करणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना नेहमी अशा पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न होत असतो. यावेळी पाकिस्तानने चालकाला यामध्ये अडकवलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.