५० किलो IED चा स्फोट एक भाड्याची व्हॅन अन्... नक्षलवाद्यांच्या हल्ल्याबाबत धक्कादायक माहिती

Naxal attack in Dantewada
Naxal attack in Dantewada
Updated on

छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात बुधवारी मोठा नक्षलवादी हल्ला झाला. या अपघातात १० DRG (जिल्हा राखीव रक्षक) जवान आणि एक चालक ठार झाला. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात एकून ११ जणांचा मृत्यू झाल्याने देशभरात शोककळा पसरली आहे. नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडीवरून वाहन गेल्यावर जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. याबाबत धक्कादायक माहित समोर आली आहे.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार,नक्षलवाद्यांनी या हल्ल्यात सुमारे ५० किलो IED वापरले. घटनास्थळाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडलेला दिसतोय फोटोत.आजूबाजूची अनेक झाडेही उन्मळून पडली आहेत. दंतेवाडामधील अरणपूरजवळ ही घटना घडली.

डीआरजी जवान ज्या वाहनातून प्रवास करत होते ती छोटी व्हॅन होती. ही व्हॅन भाड्याने बुक केली होती. विशेष म्हणजे ज्या वाहनाला बॅलेस्टिक संरक्षण नसते, ते वाहन अशा अपघातांमध्ये कित्येक फूट हवेत उडू शकते. डीआरजी जवान ज्या व्हॅनमधून प्रवास करत होते त्या व्हॅनला बॅलेस्टिक संरक्षण नव्हते. ५० किलो आयईडीच्या स्फोटामुळे व्हॅन अनेक फूट हवेत उडाली होती. यावेळी रस्त्यावर पडलेला खड्डा बघितला तर भीषणता लक्षात येईल.

Naxal attack in Dantewada
Mumbai Metro Update : घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोत तांत्रिक बिघाड

आयईडीच्या कचाट्यात आल्यानंतर वाहन उडून गेले. व्हॅनमधील सर्व ११ जणांचा जागीच मृत्यू झाला. या जवानांना नक्षलविरोधी कारवायांसाठी पाठवण्यात आले होते. मोहीम आटोपून हे जवान परतत असताना वाटेत मध्यभागी नक्षलवाद्यांच्या भूसुरुंगाच्या तडाख्यात आल्याने हा अपघात झाला.

भारतीय जवानांवरील नक्षलवादी हल्ल्याबाबत मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य समोर आले आहे. भूपेश बघेल म्हणाले, "शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. हा लढा शेवटच्या टप्प्यात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नक्षलवाद्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही. आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने नक्षलवाद संपवू"

Naxal attack in Dantewada
Sanjay Raut : "मी खासदार, मला अडवलं तर..." ; भीमा पाटस कारखान्यात राऊत आक्रमक, पोलिसांना दिला इशारा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()