Swami Prasad Maurya : स्‍वामी प्रसाद मौर्य यांच्यावर हाणला बूट ; कार्यकर्त्यांनी केली बेदम मारहाण

Swami Prasad Maurya
Swami Prasad Mauryasakal
Updated on

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा यूपीचे माजी कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर वकिलाच्या वेशात आलेल्या एका व्यक्तीने लखनऊमध्ये बूट फेकल्याची घटना घडली आहे.

या घटनेवेळी बूट लागताना स्वामी प्रसाद मौर्य थोडक्यात बचावले आहेत. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जोडा फेकून मारणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण केली. जोडा फेकणाऱ्याचे नाव आकाश सैनी असल्याची माहिती समोर येत आहे.

Swami Prasad Maurya
Eknath Shinde Vs Ramdas Kadam : रामदास कदमांवर एकनाथ शिंदे नाराज ; बैठकीत नक्की काय घडलं ?

मिळालेली माहिती अशी कि, स्वामी प्रसाद मौर्य सपाच्या मागासवर्गीय परिषदेला हजेरी लावत होते. यावेळी काळ्या कपड्यात आलेल्या आकाश सैनी नावाच्या व्यक्तीने स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर जोडा फेकून मारला.

मात्र स्वामी प्रसाद आणि त्यांच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मान खाली घातल्याने ते थोडक्यात वाचले.

Swami Prasad Maurya
Nandur Madhyameshwar Dam : नांदूरमध्यमेश्वर धरणातून 7 हजार 190 क्यूसेक्सचा विसर्ग

यावेळी जमावाने आकाश सैनीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिस येईपर्यंत सुमारे आठ-दहा मिनिटे जमावाने आकाश सैनीला मारहाण केली. यावेळी त्याचे कपडेही फाटले. मात्र पोलीस येताच त्याला जमावापासून वाचवण्यात आले.

Swami Prasad Maurya
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात साथीच्या आजाराचे थैमान ; लेप्टोचा एक बळी तर ..

नुकतीच उत्तर प्रदेश मध्ये पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे उमेदवार दारा सिंह चौहान यांच्यावर शाई फेकण्यात आली होती. यावेळी भाजप सहानुभूती मिळवण्यासाठी हे मुद्दाम करत असल्याचे उत्तर प्रदेशचे विरोधीपक्षनेते अखिलेश यादव म्हणले होते. शाई फेकणाऱ्या व्यक्तीने रविवारी रात्री पोलिस स्टेशन गाठून आत्मसमर्पण केले होते.

Swami Prasad Maurya
Jalgaon News: बेरोजगार तरुणाने नैराश्यातून मृत्युला कवटाळले; मन्यारखेडा तलावात आढळला मृतदेह

मात्र बूट फेकी बद्दल भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी अशा घटनांचे राजकारणात समर्थन करता येणार नाही, असे भाजपने म्हटले आहे.

Swami Prasad Maurya
SAKAL Exclusive: मृत्यूनंतरही मरणयातना संपेनात; स्मशानभूमीचा रस्ता बंद असल्याने घरासमोरच केले अंत्यसंस्कार!

घडलेल्या या दोन घटनांमुळे उत्तर प्रदेशचे राजकारण चांगलेच तापले आहे. भात प्रवक्ते मनीष शुक्ल म्हणाले आहेत कि, भाजपच्या उमेदवारावर जेव्हा शाईफेक झाली तेव्हा अखिलेश यादव म्हणाले होते कि, यामागे भाजपचाच हाथ आहे आता सुद्धा तेच म्हणतील असे आम्हाला वाटते.

Swami Prasad Maurya
Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कार-कंटेनरचा भीषण अपघात; २ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ४ जण जखमी

तर दुसरीकडे सपाचे म्हणणे आहे की ज्या व्यक्तीने घोसीवर शाई फेकली त्याने स्वतः भाजप नेत्याचे नाव घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.