पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेला झपाट्याने मूर्त स्वरूप येत आहे.
कोल्हापूर : वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीमुळे (GST) देशाच्या कर संकलनात चांगली वाढ झाली आहे. जीएसटी कौन्सिलमुळे व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळणार असून, लवकरच पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या (Petrol and Diesel) कक्षेत आणावे, अशी अपेक्षा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी राज्यसभेत व्यक्त केली.
ते म्हणाले, ‘कराच्या पैशातून संपूर्ण देशभरात पायाभूत सुविधांची उभारणी वेगाने होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेला झपाट्याने मूर्त स्वरूप येत आहे. २०१४ नंतर भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत असून, भ्रष्टाचाराला आळा बसत आहे. त्यामुळे विकसित भारत संकल्पना देशाला एका वेगळ्या उंचीवर नेत आहे.’
१३ डिसेंबर २०२३ ला लोकसभेत जीएसटी कायदा सुधारणा विधेयक मांडले गेले, तर आज हे विधेयक चर्चेसाठी राज्यसभेत आले. त्याला खासदार धनंजय महाडिक यांनी पाठिंबा दर्शवला. जीएसटी कौन्सिल बनवण्यासाठी अशी सुधारणा आवश्यक असून, उच्च न्यायालयात प्रलंबित असलेले ६ कोटी दावे या कौन्सिलमुळे कमी होतील, असा आशावाद महाडिक यांनी बोलून दाखवला. गेल्या महिन्यात जीएसटीमधून १ लाख ६७ हजार कोटी रुपयांचे केंद्र सरकारला उत्पन्न मिळाले, तर वर्षभरात २० लाख कोटी रुपयांचे संकलन होईल, अशी आशा आहे.
त्यातून संपूर्ण देशात अनेक पायाभूत सुविधांची वेगाने उभारणी होत असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. १२ कोटी शेतकऱ्यांना अनुदान, ८० कोटी जनतेला मोफत रेशनधान्य, आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण, वंदेभारत आणि मेट्रो रेल्वेची सुरुवात, विमानतळांची वेगाने उभारणी अशा अनेक कामांसाठी जीएसटीमधून गोळा होणाऱ्या पैशाचा विनियोग होत असल्याचे खासदार महाडिक म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.