नवी दिल्ली : देशातील लसींचा तुटवड्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर केंद्रीय मंत्री डीव्ही सदानंद गौडा (DV Sadanand Gowda) चांगलेच भडकले. "देशात लसींचा तुटवडा आहे तर मग आम्ही फाशी घ्यावी का?" असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं. तर दुसरीकडे भाजपचे सरचिटणीस सीटी रवी (CT Ravi) म्हणाले, " देशात जर व्यवस्था व्यवस्थीत नसती तर दहा पट मृत्यू झाले असते" (Should we hang ourselves over non availability of vaccines asks Sadananda Gowda)
गौडा म्हणाले, "कोर्टानं चांगल्या अर्थानं म्हटलं आहे की देशात सर्वांना लस द्या. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की, जर कोर्टानं उद्या म्हटलं की तुम्हाला इतक्याच लस द्यायच्या आहेत आणि तितक्या लस जर तयारच झाल्या नसतील तर आम्ही स्वतःला फाशी लावून घ्यावी का?" लसीच्या तुटवड्याच्या प्रश्नांवर केंद्रीय मंत्र्यांनी सरकारच्या योजनांबाबत माहिती देण्यावर जोर दिला आणि म्हटलं की, "सरकारी निर्णय कोणत्याही राजकीय लाभ किंवा इतर कोणत्याही कारणांनी प्रेरित झालेले नसतात."
काही गोष्टी सरकारच्या नियंत्रणाबाहेर
केंद्र सरकार आपलं काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं करत आलं आहे मात्र हे करत असताना काही तृटीही समोर आल्या आहेत. व्यावहारिकदृष्ट्या काही गोष्टी आमच्या नियंत्रणाबाहेर आहेत, मग अशा गोष्टींचं आम्ही व्यवस्थापन करु शकतो का? असा सवालही गौडा यांनी पत्रकारांना विचारला.
विषाणूच्या कल्पनेबाहेरील संक्रमणामुळे व्यवस्था अपयशी - सीटी रवी
यावेळी सीटी रवी म्हणाले, "जर व्यवस्था वेळेवर झाली नसती तर खूपच वाईट गोष्टी घडू शकल्या असत्या. मृत्यू १० पट किंवा १०० पट जास्त वाढले असते. कोरोना विषाणूच्या कल्पनेबाहेरील संक्रमणामुळे आमची तयारी अपयशी ठरली." कोर्टांनी कोरोनाच्या स्थितीवरुन सरकारवर ओढलेल्या ताशेऱ्यांबाबत बोलताना रवी म्हणाले, "न्यायाधीशांना सर्वकाही माहिती नसतं. आमच्याजवळ जे काही उपलब्ध आहे, त्याच्या आधारे तांत्रिक सल्लागार समिती शिफारस करते की किती लसींचं वितरण केलं गेलं पाहिजे. त्यांच्या अहवालाच्या आधारेच आम्ही निर्णय घेत असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.