Shraddha Murder Case : प्रेताचे तुकडे केले, पण शीर तसंच ठेवलं! मेकअप करून तासन् तास बघत बसायचा

पोलिस सूत्रांनुसार आफताबने श्रध्दाला बऱ्याचदा मारण्याचा प्रयत्न केला होता. हत्येनंतरही तो तिच्या शीराचा मेकअप करायचा आणि बघत बसायचा.
Shraddha Murder Case
Shraddha Murder Caseesakal
Updated on

Shraddha Murder Case : या केसमध्ये रोजच नवनवीन खुलासे समोर येत असून अंगावर काटा उभा राहत आहे. पोलिस सूत्रांनुसार आफताबने श्रध्दाला बऱ्याचदा मारण्याचा प्रयत्न केला होता. हत्येनंतरही तो तिच्या शीराचा मेकअप करायचा. सूत्रांच्या माहितीनुसार आफताबची नार्को टेस्ट केली जाऊ शकते.

आफताबच्या विकृतीचा कळस म्हणजे, त्याने श्रध्दाचं शीर फ्रीजमध्ये सगळ्यात पुढे ठेवलं होतं. हत्येनंतर तो महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांमध्ये गेला. एफएसएल च्या टीम ला फ्रीजमधून कोणताही पुरावा सापडला नाही. पण किचनमधून रक्ताचे सँपल्स मिळाले असून त्याची तपासणी केली जात आहे.

Shraddha Murder Case
Shraddha Murder Case: भरचौकात फाशी द्या; संजय राऊतांची मागणी

आफताबने ब्रेकअप दाखवण्याचा पुर्ण शडयंत्र रचलं होतं. हत्येनंतर त्याने श्रध्दाच्या फोनवरून स्वतःला ५४ हजार रुपये पाठवले होते. दिल्ली पोलिस सुत्रांनुसार आफताबने सांगितलं की, त्याचं जेंव्हाही श्रध्दासोबत भांडण व्हायचं तेव्हा तिचा खून करावा असं त्याला वाटायचं. पण तिला सारखे तिचे मित्र भेटायला यायचे त्यामुळे पकडले जाऊ या भितीने तो ते करत नव्हता.

Shraddha Murder Case
Shraddha Murder Case: 'मेरा अबदुल ऐसा नही' केतकी चितळेची दिल्ली मर्डर प्रकरणावरील पोस्ट चर्चेत

हत्येनंतर तो फार घाबरला होता. पकडला जाईल अशी भिती त्याला होती. मग त्याने ठरवलं की, तो नॉर्मल वागेल ज्यामुळे कोणाला संशय येणार नाही. म्हणून त्याने साधारण २ महिने १८ वेगवेगळे दिवस वेगवेगळ्या ठिकाणी तिचे तुकडे फेकले. तिचं इंस्टा अकाउंटही तो अपडेट करत राहिला.

Shraddha Murder Case
Shraddha Murder Case: लव्ह जिहादवरून राम कदम आक्रमक! श्रद्धाला न्याय मिळवून देण्यासाठी...

त्यानं सांगितलं की, पोलिसांपासून वाचावं, शिक्षेत सुट मिळावी म्हणून तो श्रध्दाच्या शीराचा मेकअप करायचा. ज्यामुळे तो पोलिसांना मानसिक रुग्ण वाटावा आणि त्याची शिक्षा कमी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.