Shraddha Murder Case: ''श्रद्धा मृत आहे की जिवंत याची खात्री करावी लागेल'' डॉक्टरांचं नेमकं म्हणणं काय?

Shraddha Murder Case
Shraddha Murder Casesakal
Updated on

नवी दिल्लीः देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा खून प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आलेली आहे. श्रद्धाच्या मृत्यूबाबत डॉक्टरांना महत्त्वाचा पुरावा हवा आहे. त्याशिवाय तिच्या मृत्यूबाबत खात्री करता येणार नाहीये.

श्रद्धा वालकरचा डीएनए रिपोर्ट पुढील आठवड्यामध्ये अपेक्षित आहे. तसेच जंगलामध्ये सापडलेल्या हाडांची विशिष्टपणे तपासणी होईल, त्यानंतर ती हाडं श्रध्दाचीच असल्याची खात्री होईल. मगच तिच्या मृत्यूबद्दल स्पष्टता येईल, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

हेही वाचाः आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

अद्यापही श्रद्धाची कवटी आणि शरीराचे इतर भाग सापडलेले नाहीत. पोलिस त्यादृष्टीने तपास करीत आहेत. पोलिसांच्या सांगण्यानुसार त्यांना या प्रकरणामध्ये आणखी पुरावे सापडलेले आहेत. परंतु तपासामध्ये अडथळा येऊ शकतो म्हणून ते सांगतायेत नाहीत.

Shraddha Murder Case
Shraddha Murder Case: श्रद्धा खून प्रकरणाचं असंही चीन कनेक्शन; धक्कादायक माहिती समोर

दरम्यान, आफताबची नार्को आणि पॉलिग्राफ चाचणी झालेली आहे. दोन्ही चाचण्यांसाठी आफताबने सहकार्य केलं. बहूतांश प्रश्नांची त्याने उत्तरंही दिलेली आहेत. यामधून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळालीय. 'झी न्यूज'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.