नवी दिल्ली - दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाला भाजप नेत्यांनी 'धार्मिक अँगल' दिल्याची टीका असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्यासह भाजप नेत्यांवर निशाणा साधत ते म्हणाले की, हे 'लव्ह जिहाद'चे प्रकरण नाही. (Love Jihad news in Marathi)
यावेळी ओवेसी म्हणाले की, "हिमंत सरमा यांनी आपण मुख्यमंत्री आहोत हे समजून घ्यायला हवं. प्रेम म्हणजे प्रेम असतं, जिहाद नसतं. आसाममध्ये ते द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. श्रद्धा वालकर प्रकरण शोषणाचा मुद्दा आणि त्याकडे तसेच पाहिले पाहिजे.
ओवेसी पुढं म्हणाले की, "मी भाजप नेत्यांना लव्ह जिहादची आकडेवारी मागितली, पण त्यांनी संसदेत कोणताही डेटा दिला नाही. 'हा मुद्दा लव्ह जिहादचा नसून, एका महिलेविरोधातील शोषण आणि अत्याचाराचा मुद्दा आहे. त्याकडे अशाच प्रकारे पाहायला हवं. शिवाय त्याचा निषेध करायला हवा,' असंही ओवेसी म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीच्या चर्चेत बोलत होते.
आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान श्रद्धाच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच लव्ह जिहादविरोधात कठोर कायदा करण्याची मागणी केली होती. लव्ह जिहाद हा एक शब्द आहे. भाजप आणि उजव्या विचारसरणीच्या नेत्यांकडून अनेकदा बळजबरी किंवा फसवणुकीद्वारे बेकायदेशीर धर्मांतर केल्याच्या आरोपासाठी लव्ह जिहाद हा शब्द वापरला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.