Shraddha Walkar Case (Marathi News) : 'न्यूज ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल स्टँडर्ड्स अथॉरिटी'ने न्यूज १८ इंडियावर कारवाई केली आहे. श्रद्धा वालकर हत्येप्रकरणात चॅनेलने लव्ह जिहाद असं म्हणत द्वेष निर्माण केल्याने ही कारवाई करण्यात आली.
Love Jihad
न्यूज १८ इंडियाने आपल्या चॅनेलवर तीन शोमध्ये 'लव्ह जिहाद' असा उल्लेख केला होता. यामध्ये दोन शो अँकर अमन चोप्रा यांनी सादर केले होतो. तर एक शो अमिश देवगण यांनी सादर केला होता. या शोच्या माध्यमातून जातीय रंग देण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे.
न्यूज ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल स्टॅँडर्डस् अथॉरिटीने चॅनेलवर ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. शिवाय सदरील व्हिडीओ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
श्रद्धा वालकर (वय २७) या मुंबईतील तरुणीची हत्या तिचा पार्टनर अफताब पुनावाला (वय २८) यानं क्रूर पद्धतीनं हत्या केली होती. दिल्लीतल्या छत्तरपूर भागातील आपल्या घरात त्यानं श्रद्धाचा खून करुन तिच्या शरीराचे तुकडे केले. करवत आणि धारदार सुऱ्यानं त्यानं हे तुकडे केले. तसेच हे तुकडे त्यानं दिल्लीतील विविध भागात टाकून दिले होते.
दरम्यान, ऑक्टोबर २०२२ मध्ये श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी पोलिसांत आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. कारण तिचा फोन लागत नसल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं होतं. अफताब पुनावाला सोबत रिलेशनशीपममध्ये असल्यानं बाप-लेकीमध्ये जास्त संवाद होत नव्हता. त्यानंतर नोव्हेंबर हे भयानक प्रकरण उघडकीस आलं होतं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.