एक डेटिंग App, एक वेबसीरिज आणि त्यानंतर एका तरुणीची निर्घृण हत्या. त्यात आता लव्ह जिहादचं कनेक्शन... हे संपूर्ण प्रकरण आहे मुंबईतल्या श्रद्धा वालकरच्या हत्येचं... आता या हत्या प्रकरणात नवनवे ट्विस्ट आलेत. चला सविस्तर समजून घेऊयात
पहिल्यांदा श्रद्धाच्या हत्येनंतरही आरोपी आफताबची डेटिंग आणि सेक्स लाईफ नॉर्मल होती. दुसरी महत्वाची बाब म्हणजे या प्रकरणाचं लव्ह जिहाद कनेक्शन. याप्रकरणात श्रध्दाच्या वडिलांनी याबद्दल संशय व्यक्त केला आहे. हत्येनंतर १६ दिवस तो मृतदेहाची विल्हेवाट लावत होता, यानंतर अडीच तास दिल्लीच्या जंगलात पोलीस तपासणी करत होते. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे श्रद्धाचं मृत्यूपूर्वीचं मित्रासोबतचं चॅट...
सर्वात आधी पाहूयात या हत्येनंतर आरोपी आफताब काय करत होता?
श्रद्धाच्या हत्येनंतरही आरोपी आफताबचं डेटिंग लाईफ आणि सेक्स लाईफ नॉर्मलरित्या सुरु होतं. इतकंच काय तर अगदी ज्या खोलीत त्यानं श्रद्धाची हत्या केली होती, ज्यावेळी श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे त्याच्या घरातील फ्रीजमध्ये होते, त्याच काळात आफताब पुन्हा एकदा डेटिंग app वरील मुलीला घरी बोलावून त्याच्या प्रेमाची नवी रासलीला रचत होता. आणि आफताबनंच पोलीस तपासात ही कबुली दिली आहे.
या प्रकरणाचं लव्ह जिहाद कनेक्शन असल्याचा संशय मृत तरुणी श्रद्धाचे वडील विकास वालकरांनी व्यक्त केलाय. यावेळी त्यांनी नोव्हेंबरमध्येच वसई पोलिसात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांना मुलीच्या नात्याविषयी माहिती असल्यानं मुलगी बेपत्ता होण्यामागे आफताबचा हात असू शकतो, अशी भीतीही त्यांनीही पोलिसांना बोलून दाखवली. परंतु प्राथमिक तपासात श्रद्धाचं लास्ट लोकेशन दिल्ली आल्यानं पुढे हा तपास दिल्ली पोलिसांकडे वर्ग झाला. पण जोपर्यंत सापडलेल्या अवयवांची डीएनए चाचणी होत नाही तोपर्यंत आफताबच्या हत्येचा आणि मुलीच्या मृत्यूच्या दाव्यांवर विश्वास ठेवत नाही, असंही विकास वालकरांनी म्हटलंय. पण ६ महिन्यांपूर्वीच्या दुष्कृत्याचा ४ दिवसात दिल्ली पोलिसांनी छडा लावला आणि उजळ माथ्यानं, काहीही न झाल्याच्या आविर्भावात वावरणाऱ्या आफताब पूनावालाला गजाआड केलं.
आफताबनं पोलिसांना काय कबुली दिली?
गळा आवळून हत्या करणं सोप्पं होतं. पण मृतदेहाची विल्हेवाट लावणं अवघड होतं. त्यासाठी त्यानं इंटरनेटवर डेक्स्टर ही वेबसीरिज पाहिली आणि मग हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हे ठरवलं. त्यातच तो शेफ असल्यानं चॉपिंग स्किल्सचा वापर करुन त्यानं श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५-३६ तुकडे केले आणि ते लपवण्यासाठी एक फ्रीजही खरेदी केला. आणि या फ्रीजमध्येच त्यानं श्रद्धाच्या शरीराचे तुकडे लपून ठेवले.
खरंतर श्रद्धा आणि आफताब दोघेही मल्टिनॅशनल कंपनीसाठी आधी मुंबईत आणि नंतर दिल्लीत कॉल सेंटरमध्ये काम करायचे. २०१८ सालापासून ते रिलेशनशिपमध्ये होते. पण मे महिन्यात दिल्लीला स्थायिक झाल्यानंतर श्रद्धानं आफताबकडे लग्नासाठी तगादा लावला आणि इथेच दोघांमध्ये फिस्कटलं. आणि मग आफताब पूनावालानं अत्यंत शांत डोक्यानं श्रद्धाची हत्या केली. आधी सांगितल्याप्रमाणेत तिच्या शरीराचे तुकडे केले, ते घरातील फ्रीजमध्येच ठेवले. त्यानंतर घरात दुर्गंधी येऊ नये म्हणून एअर फ्रेशनर, डिओडरंट, परफ्युम वगैरे वापरलं.
हत्येनंतर आफताबला श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पुढचे १६ दिवस लागले. कारण तो दररोज मध्यरात्री २ वाजता हे तुकडे पिशवीत टाकून घेऊन जायचा आणि जंगलात टाकून द्यायचा, जेणेकरून प्राणी खातील. कोणालाही शंका येऊ नये यासाठी त्याने मृतदेहाचे आणखी बारीक तुकडे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी टाकून दिले. आणि आफताबला घेऊन पोलिसांनी दिल्लीतल्या जंगलातल्या वेगळवेगळ्या ठिकाणची अडीच तास तपासणी केली.
श्रद्धाला आधीत संशय होता?
खरंतर ही घटना मे महिन्यात म्हणजे जवळपास ६ महिन्यांपूर्वी घडली. ६ महिन्यांपर्यंत आफताबला त्यानं केलेली हत्या लपवण्यात तो यशस्वी झाला असं वाटत होतं. पण, श्रद्धाच्या वडिलांनी दिल्ली पोलिसात आफताबविरोधात तक्रार दिली आणि फक्त चारच दिवसात दिल्ली पोलिसांनी त्याची पाळंमुळं खोदून काढली आणि आफताबच्या या क्रूर कृत्याचा पर्दाफाश केला. आणि त्यात महत्वाची भूमिका श्रद्धानं तिच्या मित्राला केलेल्या एका मेसेजची होती. ते म्हणजे आफताबच्या डोक्यातील हत्येच्या विचाराची कुणकुण श्रद्धाला बहुदा आधीच लागली होती. त्यामुळेच तिने एकदा लक्ष्मणला व्हॉट्सअपवर मेसेज केला होता. त्यात तिने आफताफसोबत होत असलेल्या वादाची माहिती दिली. आणि थेट आज रात्री जर त्याच्यासोबत थांबले तर तो मारुन टाकेल असा मेसेज करत वाचवण्याची विनंती केल्याचं लक्ष्मणनं म्हटलं आहे.
उशिरा का होईना, श्रद्धाच्या हत्येचं पितळ उघडं पडलंय. आणि वेळीच योग्य गोष्टी घडल्या असत्या तर आज श्रद्धा हयात असती हे नक्की.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.