Shraddha Walker Murder Case: श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताब पूनावालाविरोधात पोलिसांना मिळाले हे 'मोठे पुरावे'

Shraddha Walker Murder Case: दिल्ली पोलिसांनी मंगळवारी श्रद्धा वालकर खून प्रकरणात 3000 पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे, ज्यामध्ये श्रध्दाचा लिव्ह-इन पार्टनर आणि आरोपी आफताब पूनावाला यांच्याविरुद्ध सापडलेले ठोस पुरावे नमूद केले आहेत.
Shraddha Walker Murder
Shraddha Walker MurderEsakal
Updated on

काही महिन्यापुर्वी देशाची राजधानी दिल्ली येथे एक धक्कादायक घटना घडली होती. त्या घटनेने संपुर्ण देश हादरला होता. दिल्लीत लिव्ह-इन मध्ये राहणाऱ्या श्रद्धा वालकर नावाच्या तरूणीची हत्या करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे करण्यात आले होते. दिल्ली पोलिसांनी मंगळवारी श्रद्धा वालकर खून प्रकरणात 3000 पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे, ज्यामध्ये श्रध्दाचा लिव्ह-इन पार्टनर आणि आरोपी आफताब पूनावाला यांच्याविरुद्ध सापडलेले ठोस पुरावे नमूद केले आहेत. आरोपपत्रात घटनांशी जुळणाऱ्या आफताब पूनावालासंबधी काही पुरावे आहेत, जे हत्या प्रकरणाशी मिळतेजुळते आहेत.

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात तपासादरम्यान गोळा केलेल्या अनेक डिजिटल आणि फॉरेन्सिक पुराव्यांचा समावेश करण्यात आला आहे. डिजिटल पुराव्यामध्ये आफताब पूनावालाच्या गुगल लोकेशन हिस्ट्रीचा समावेश आहे, त्याने ज्या ठिकाणी शरीराचे तुकडे टाकले त्या ठिकाणांशी सबंधित आहे.

यात श्रद्धा वालकरच्या फोनच्या गुगल लोकेशनचाही समावेश आहे आणि हा फोन दोनदा मुंबईत कसा पोहोचला आणि आफताबला चौकशीसाठी बोलावले तेव्हा त्याची हिस्ट्री कशी गायब झाली हेही दाखवण्यात आले आहे. आरोपी आफताब पूनावाला (28) याच्यावर त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकर (27) हिची हत्या करून तिच्या शरीराचे 35 तुकडे केल्याचा आरोप आहे.

Shraddha Walker Murder
Prajwal Revanna: 'मी 31 मे रोजी SIT समोर हजर होणार', सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या प्रज्वल रेवण्णाने दिली पहिली प्रतिक्रिया

पोलिसांनी दिलेल्या चार्जशीटमध्ये आफताब पूनावाला यानी "फ्लेअर गन" वापरल्याच्या सर्च हिस्ट्रीमध्ये तपशीलवार अहवाल देखील समाविष्ट केला आहे. त्याचा इतर सर्च हिस्ट्री देखील घटनांशी जुळती आहे. साकेत न्यायालयात महानगर दंडाधिकारी अविरल शुक्ला यांच्यासमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

आफताब पूनावाला याला 12 नोव्हेंबर 2022 रोजी दक्षिण दिल्लीतील मेहरौली भागात भाड्याच्या फ्लॅटमध्ये श्रद्धा वालकरची हत्या केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. दिल्ली पोलिसांनी सांगितले होते की, आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला आणि तिच्या शरीराचे 35 तुकडे केले, जे त्याने सुमारे तीन आठवडे घरी 300 लिटरच्या फ्रीजमध्ये ठेवले होते. श्रध्दाच्या शरीराचे तुकडे फेकण्यासाठी तो मध्यरात्री शहरातील विविध भागात अनेक दिवस फिरत होता. यासंबंधीचे वृत्त न्यूज १८ हिंदीने दिले आहे.

Shraddha Walker Murder
Pune Porsche Accident: कल्याणीनगर अपघातप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या डॉक्टरांची धक्कादायक माहिती; म्हणाले, 'सर्वांची नावे...'

आर्थिक कारणावरून दोघांमध्ये सतत भांडणे होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांमधील भांडणानंतर पूनावालाने 18 मे 2022 रोजी संध्याकाळी 27 वर्षीय श्रद्धा वालकरचा गळा दाबून खून केल्याचा संशय आहे. श्रद्धा ही महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसईची रहिवासी होती. दोघेही मुंबईत डेटिंग ॲप 'बंबल'च्या माध्यमातून भेटले होते. यानंतर ते मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये एकत्र काम करू लागले आणि तिथूनच त्यांचे प्रेमप्रकरण सुरू झाले.

Shraddha Walker Murder
Akola Crime News : 'सावकाराकडून ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न...'; व्हायरल व्हिडीओने महाराष्ट्रात खळबळ, वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.