Shraddha Walker Case: श्रद्धाचा मृतदेह फ्लॅटमध्ये असताना आफताबसोबत वेळ घालवणारी तरुणी आली समोर; म्हणाली...

shraddha walker murder case
shraddha walker murder case
Updated on

नवी दिल्ली - आफताब पूनावालाच्या नव्या प्रेयसीला हे माहीत नव्हते की, आफताब खुनी आहे. तसेच ज्या फ्लॅटमध्ये ती आफताबला भेटायला जायची त्या फ्लॅटमध्ये त्याने खून केला होता, याचा आपल्याला मागमूसही नव्हता, असंही तिने म्हटलं. श्रद्धाच्या हत्येनंतर सुमारे 12 दिवसांनी म्हणजे 30 मे रोजी आफताब ऐका ऍपच्या माध्यमातून नवीन गर्लफ्रेंड पटवली होती. (shraddha walker murder case news in Marathi)

shraddha walker murder case
Crime: अल्पवयीन मुलाचे निर्घृण कृत्य! पॉर्न पाहून बलात्कार अन् मग दहा वर्षाच्या मुलीची हत्या

आफताबची नवी गर्लफ्रेंड व्यावसायाने मानसोपचार तज्ज्ञ आहे. श्रद्धाच्या हत्येनंतर ही मुलगी आफताबच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा पोलिसांनी तिची चौकशी केली. चौकशीदरम्यान, मुलीने खुलासा केला की, आफताबशी संभाषण बंबल अॅपच्या माध्यमातून मे महिन्यात सुरू झाले. त्यानंतर 12 ऑक्टोबर रोजी आफताबच्या फ्लॅटवर पहिल्यांदा गेले होते. आफताबने तिला छतरपूरच्या फ्लॅटवर बोलावले होते. दोघांनी एकत्र वेळ घालवला होता. या काळात आफताबचा स्वभाव अगदी सामान्य आणि अत्यंत काळजी घेणारा वाटत होता. आफताबकडे अनेक प्रकारच्या परफ्युम्सचा संग्रह होता आणि अनेकदा तो तिला परफ्यूम गिफ्ट देत असे.

shraddha walker murder case
SAKAL Impact : पोलिस भरतीसाठी 15 दिवसांची मुदतवाढ; उपमुख्यमंत्र्यांनी केले जाहीर

डॉक्टर तरुणी म्हणाली की, आफताब खूप सिगारेट ओढायचा आणि सिगारेटही बनवायचा. पण अनेकदा तो सिगारेट सोडण्याबद्दल बोलायचा आणि खूप खूश व्हायचा. पोलिसांनी दिलेल्या जबाबात तरुणीने सांगितले की, ऑक्टोबर महिन्यात दोन वेळा आफताबच्या फ्लॅटवर गेले होते. पण श्रद्धाच्या हत्येबाबत किंवा घरात शरीराचे तुकडे असल्याबाबत तिला किंचितही सुगावा लागला नाही. आफताब कधीच घाबरलेला दिसत नव्हता. उलट आपल्या मुंबईतील घराबद्दल तो नेहमी सांगायचा.

shraddha walker murder case
Nagnath Kottapalle passes away : माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले कालवश

आफताबला वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांची खूप आवड होती आणि तो नेहमी वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधून नॉन-व्हेज पदार्थ मागवत असे. आफताबने डॉक्टर तरुणीला १२ ऑक्टोबर रोजी एक फॅन्सी अंगठी भेट म्हणून दिली होती. मात्र ही अंगठी श्रद्धाची होती.

पोलिसांनी डॉक्टर तरुणीला सांगितलं की, आफताबने श्रद्धाचा खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे ऑक्टोबरपर्यंत घरात ठेवले होते. मित्रांपासून लपविण्यासाठी तो मृतदेहाचे तुकडे कधी फ्रिजमध्ये तर कधी कपाटात ठेवत होता. हे ऐकल्यानंतर आफताबची गर्लफ्रेंड घाबरून गेली. तसेच ती म्हणाली की आफताब ज्या पद्धतीने काळजी घ्यायचा त्यावरून कधीच वाटलं नाही की आफताब असं काही करू शकतो. पोलिसांनी म्हटलं की, आफताबने डॉक्टर गर्लफ्रेंडला मागमूसही लागू दिला नाही की, त्याने श्रद्धाचा मृतदेह फ्लॅटमध्ये ठेवला होता.

हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.