'वीर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांनी देशासाठी बलीदान दिले आहे. कैदेत असताना त्यांचा छळ होऊनही दाद दिली नाही.'
चिक्कोडी : बेळगाव येथील सुवर्णसौधमध्ये (Suvarna Vidhana Soudha Belgaum) वीर सावरकरांची प्रतिमा लावली आहे. देशासाठी त्याग, बलिदान दिलेल्या या महान व्यक्तीची प्रतिमा काढण्याबाबतचे वक्तव्य करणाऱ्या मंत्री प्रियांक खर्गे यांचा निषेध करायला पाहिजे. हिम्मत असेल तर मंत्र्यांनी ती प्रतिमा काढून दाखवावी, राज्यभर आंदोलन करून त्याला उत्तर दिले जाईल, असा इशारा श्रीराम सेनेचे नेते प्रमोद मुतालिक (Shri Ram Sena leader Pramod Mutalik) यांनी दिला.
चिक्कोडीतील बैठकीत ते बोलत होते. मुतालिक म्हणाले, ‘वीर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांनी देशासाठी बलीदान दिले आहे. कैदेत असताना त्यांचा छळ होऊनही दाद दिली नाही. सावरकरांचा इतिहास समजून घेऊन बोलावे. त्यांच्यावरील खपवून घेतले जाणार नाही.’
मुतालिक म्हणाले, ‘हुबळी येथील मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाग घेऊन समाजाला दहा हजार कोटी रूपये देण्याचे जाहीर वक्तव्य केले आहे. त्यांनी मालमत्ता असल्यासारखे बोलू नये. मतांसाठी उधळपट्टी करण्याला आक्षेप आहे.’
याच कार्यक्रमात सिद्धरामय्या यांच्याबरोबर बसलेल्या मुस्लिम धार्मिक नेते तन्वीर हाश्मी यांच्यावर वादग्रस्त आणि प्रक्षोभक भाषणांचे आरोप आहेत. त्यांचे अनेक वादग्रस्त व्हिडिओ आहेत. अशा व्यक्तीचे समर्थन करणे योग्य नाही. याप्रकरणी विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी केलेल्या आरोपांत तथ्य आहे. त्यासाठी हाश्मी यांची एनआयएकडून चौकशी व्हावी. यावेळी श्रीराम सेनेचे राज्य प्रधान कार्यदर्शी शिवराज अंबारी, विठ्ठल पुजारी, बसवराज कल्याणी, गजेंद्र कट्टीकर, अनिल जोल्ले, रामू कमते, महावीर पाटील आदी उपस्थित होते.
हिंदू परंपरेप्रमाणे गुढीपाडव्याला नवीन वर्ष येते. पण, विदेशी संस्कृतीप्रमाणे अलीकडे ३१ डिसेंबरला रात्री बारानंतर मोठा धिंगाणा होताना दिसत आहे. या प्रकाराला श्रीराम सेनेचा विरोध आहे. रात्री दारू पिऊन, ड्रग्स घेऊन अनेक तरुण-तरुणी व्यसनात जात आहेत. या काळात अत्याचार वाढतात. त्यासाठी सरकारने अशा कार्यक्रमांवर बंदी घालावी. यासाठी श्रीराम सेनेकडूनही जागृती केली जाणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.