Shrikant Shinde: शिवसेनेच्या लोकसभा गटनेतेपदी श्रीकांत शिंदे; श्रीरंग बारणे बनले मुख्य प्रतोद

शिवसेना लोकसभा गटनेता निवड प्रक्रिया ही शिवसेना पक्षांतर्गत करण्यात आली आहे.
Shrikant Shinde: शिवसेनेच्या लोकसभा गटनेतेपदी श्रीकांत शिंदे; श्रीरंग बारणे बनले मुख्य प्रतोद
Updated on

नवी दिल्ली : शिवसेना लोकसभा गटनेतेपदी कल्याण-डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे. शिवसेनेच्या संसदीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी श्रीरंग बारणे यांनी श्रीकांत शिंदेंच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तर बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी याला अनुमोदन दिलं. (Shrikant Shinde elected of Shiv Sena Lok Sabha group leader Srirang Barane became chief whip)

Shrikant Shinde: शिवसेनेच्या लोकसभा गटनेतेपदी श्रीकांत शिंदे; श्रीरंग बारणे बनले मुख्य प्रतोद
Rajiv Kumar on EVM: "ईव्हीएमचा जन्मच चुकीच्या मुहुर्तावर झाला, पुन्हा शिव्या..."; मुख्य निवडणूक आयुक्त असं का म्हणाले?

श्रीकांत शिंदे गटनेतेपदी निवड

शिवसेना संसदीय समितीची बैठक संसद भवनातील शिवसेना पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीत सर्व शिवसेना खासदारांनी एकमताने गटनेतेपदी खासदार श्रीकांत शिंदे यांची निवड केली. शिवसेना लोकसभा गटनेता निवड प्रक्रिया ही शिवसेना पक्षांतर्गत करण्यात आली आहे. लोकसभा सभापतींची निवड झाल्यानंतर शिवसेना लोकसभा गटनेतेपदाची अधिकृत निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

Shrikant Shinde: शिवसेनेच्या लोकसभा गटनेतेपदी श्रीकांत शिंदे; श्रीरंग बारणे बनले मुख्य प्रतोद
PM Modi Claim Power: मोदींनी राष्ट्रपतींकडं केला सत्ता स्थापनेचा दावा; शपथविधीसाठी दिलं निमंत्रण

संसदेच्या दोन पदांबाबत चर्चा

दरम्यान, लोकसभा गटनेतेपदी निवड झाल्यानंतर श्रीकांत शिंदे म्हणाले, "आमच्या सर्व आठ खासदारांनी यामध्ये ७ लोकसभा खासदार आणि १ राज्यसभा खासदार यांनी एक बैठक पार पडली. या बैठकीत संसदेच्या दोन पदांबाबत चर्चा झाली आणि त्यावर निर्णय झाला. यावेळी सर्व खासदारांनी मिळून मला लोकसभा संसदीय पक्षाचा नेता म्हणून माझी निवड केली, यासाठी मी त्या सर्वांचे आभार मानतो. संसदेत सर्वांना सोबत घेऊन चांगलं काम करु"

श्रीरंग बारणेंची मुख्य प्रतोद म्हणून निवड

"तसंच आमचे वरिष्ठ खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची एकमतानं मुख्य प्रतोद म्हणून निवड केली आहे. मी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. संसदेत शिवसेनेच्यावतीनं चांगलं काम होईल यासाठी आम्ही प्रयत्न करु," असंही यावेळी श्रीरंग बारणे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.