Shrikant Thackeray Death Anniversary : जेव्हा राग भैरवचा आलाप ऐकून बेशूद्ध पडलेल्या श्रीकांत ठाकरेंना जाग आली!

Shrikant Thackeray
Shrikant ThackerayEsakal
Updated on

एखाद्या व्यक्तीचे पूर्वजन्मातील कोणाशीतरी असलेले नाते पुढील जन्मातही असेच असते. मग ते नाते माणसाशी असो किंवा संगीत विद्येशी. याची प्रचिती माणसाला देव वेळोवेळी देत असतो. तसच काहीसं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांच्या बाबतीत घडलं. श्रीकांत ठाकरे यांचे संगीत क्षेत्रातील योगदान मोठे आहे. त्यांची आणि संगीत विद्येची नाळ घट्ट जोडलेली आहे. हे एका प्रसंगातून लक्षात येते.

मराठी चित्रपटात प्रथम गझल आणणारे संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचा जन्म २७ जून १९३० रोजी झाला. श्रीकांतजी म्हणजे अनेक कलांच्या पसाऱ्यात रमणारे एक मनस्वी कलावंत होते. अनेक विषयांत त्यांना गती होती. त्यांना काय येत नव्हतं? गाण्यांच्या चाली तर ते करतच. पण त्याशिवाय सतत त्यांचं लेखन चालू असे. ते उत्तम चित्रकार, व्यंगचित्रकार होते.

Shrikant Thackeray
Maharashtra Politics: सर्व नेत्यांना एकत्र आणण्यात सुप्रिया सुळेंना अपयश; सेनेतल्या दुफळीमुळं शिष्टमंडळात वाद

व्यंगचित्रकारासाठी लागणारी सूक्ष्म निरीक्षणशक्ती त्याच्याकडे होती. होमिओपॅथीचाही त्यांचा चांगला अभ्यास होता. व्हायोलीनसारखे कठीण वाद्यं ते छान वाजवीत असत. ते केवळ संगीतकारच नव्हते तर एक उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, समीक्षक, पत्रकार, संगीतकार, वादक, उर्दूचे अभ्यासक आणि आयुर्वेदाचे अभ्यासकही होते. संगीतकार म्हणून श्रीकांतजी व्हॉयोलिन  वादनात निपुण होते, सतत वेगवेगळ्या संगीताच्या चाली त्यांच्या मनात रुंजी घालत आणि यामुळे सुरेल गाण्यांची निर्मिती त्यांच्या हातून झाली.

Shrikant Thackeray
Health Alert: वेळेआधीच मृत्यूचा धोका याच पदार्थांनी वाढतो! यांचा अतिवापर घातक...

ठाकरे कुटूंबीय दादरच्या मिरांडा चाळीत राहायचे. त्यांच्या घरी एका नाटक कंपनीची तालिम चालायची. श्रीकांत ठाकरे तेव्हा दीड वर्षांचे असताना त्यांना फिट येण्याचा त्रास व्हायचा. अशीच एकदा त्यांना फिट आली होती. त्यावेळी घरात नाटक कंपनीची तयारी सुरू होती. त्यावेळी सगळेच घाबरलेले होते. काय करावे सुचत नव्हते. श्रीकांतजींची आई त्यांना मांडीवर घेऊन बसली होती.

Shrikant Thackeray
Gold Rate : वीकेंडला सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

श्रीकांतजी निपचीत पडले होते. त्यावेळी वडिल प्रबोधनकार ठाकरेंनी नाटक कंपनीच्या व्हायोलिन वादकाला राग भैरवचा आलाप वाजवण्यास सांगितले. तो राग ऐकून आईच्या मांडीवर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या श्रीकांतला शुद्ध आली. हा एक दैवी चमत्कारच मानावा लागेल. पण, तेव्हाच हा मुलगा मोठा होऊन संगीत क्षेत्र गाजवणार हे पक्क झाले होते. हा चमत्कार पाहून डॉक्टरांनीही आश्चर्य व्यक्त केले होते.

ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांना मराठी गाण्यांची संधी श्रीकांत ठाकरे यांच्यामुळेच मिळाली. श्रीकांत ठाकरे स्वतःउर्दूचे उत्तम जाणकार होते. त्यामुळे मराठी ‘च’ चा उच्चार हिंदी गायकांना करता येत नाही म्हणून मोहम्मद रफींच्या गाण्यात ‘च’ हे अक्षर श्रीकांत ठाकरे शक्यतो टाळायचे. इतकच काय तर, मोहम्मद रफींसाठी ते मराठी गाणी उर्दू मध्ये लिहून द्यायचे.

Shrikant Thackeray
Udayanraje Bhosale : राज्यपालांच्या वक्तव्यावर मोदी गांभीर्याने विचार करतील; उदयनराजे भोसले

श्रीकांतजींनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी लोकप्रिय आहेत यामध्ये अगं पोरी सवाल दर्याला तुफान, नको आरती की नको पुष्पमाला, तुझे रुप सखे गुलजार, प्रभू तू दयाळू, शोधीसी मानवा राऊळी मंदिरी, सारखी अवीट भक्ती, भाव आणि कोळी गीतांचा समावेश, मराठी संगीत विश्वात श्रीकांतजी आणि मोहम्मद रफी ही संगीत-गायक जोडगोळी म्हणजे कानसेनांसाठी पर्वणीच आहेत.

गझल हा गाण्यांचा प्रकार श्रीकांतजींमुळे मराठीत रुजला. उत्तरा केळकर, सुरेश वाडकर, शोभा गुर्टू, पुष्पा पागधरे सारख्या गायकांनी श्रीकांतजींच्या संगीताची सुरेलता वाढवली. शूरा मी वंदिले, सवाई हवालदार, महानदीच्या तीरावर सारख्या चित्रपटांची निर्मिती देखील श्रीकांत ठाकरे यांनी केली.

Shrikant Thackeray
Veena Kapoor Murder: मुलानेच केली अभिनेत्री वीणा कपूरची हत्या! मृतदेह फेकला..

एका मुलाखतीत श्रीकांतजींबद्दल उत्तरा केळकर म्हणतात, जाण्याच्या अगोदर, शेवटच्या दोन वर्षांत श्रीकांतजींची तब्येत खूप खालावली होती. हॉस्पिटलच्या फेऱ्या सुरू झाल्या. फोनही कमी व्हायला लागले. जाण्याआधी दोन महिने आधी त्यांचा मला फोन आला उत्तरा, नवीन चित्रपट करतोय, ‘महानदीच्या तिरावर’ आणि मुहूर्ताचं गाण तू गायचंस. ठाऊक आहे ना? माझं गाणं म्हणजे चार-पाच तरी रिहर्सल करायला लागतील.’ मी हसून म्हटलं, ‘तुमचं समाधान होईपर्यंत मी रिहर्सल करीन.’ सगळ्या रिहर्सल त्यांच्या जुन्या घरात झाल्या. त्यांनी गाणं शिकवलं, चाल सांगितली. पण नेहमीचा उत्साह त्याच्यात नव्हता. पेटीवरची बोटं थरथरत होती.

श्रीकांतजींचे ‘जसं घडलं तसं’ हे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. राजकारण आणि गर्दीपासून स्वतःला नेहमीच अलिप्त ठेवणाऱ्या या संगीतकाराने १० डिसेंबर २००३ रोजी अखेरचा श्वास घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()