Shrinagar Target Killings: श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांचं पुन्हा टार्गेट किलिंग! परप्रांतीयांवर अंदाधुंद गोळीबारात एक ठार, एक गंभीर

एके ४७ रायफलनं या दहशतवाद्यांनी हा अंदाधुंद गोळीबार केला.
J & K
J & K Sakal
Updated on

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी काही परप्रांतीय नागरिकांना टार्गेट केल्याचं वृत्त आहे. यामध्ये दोन पंजाबी नागरिकांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला, यामध्ये एक जण ठार झाला असून दुसरा गंभीररित्या जखमी झाला आहे. बुधवारी संध्याकाळी शहीद गुंज भागात हा प्रकार घडला. (shrinagar target killings by terrorists indiscriminate firing on migrants one killed one seriously injured)

स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, ज्या नागरिकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला यामध्ये मृत्यू पावलेल्या नागरिकाचं नाव अमृतपाल सिंग तर जखमी झालेल्याचं नाव अद्याप कळू शकलेलं नाही. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Latest Marathi News)

J & K
Nagpur Bus Tiffin Bomb: नागपूरच्या बसस्थानकात आढळला 'टिफिन बॉम्ब'; तीन दिवस डेपोतच होती उभी बस

अमृतपाल सिंग हा अमृतसरचा रहिवासी असून त्याच्यावर दहशतवाद्यांनी पॉईंट ब्लँक रेंजवरुन गोळ्या झाडल्या. एके ४७ रायफलमधून हा गोळीबार करण्यात आला. श्रीनगरमधील हब्बा कदाल भागातील शल्ला कदाल इथं संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. (Marathi Tajya Batmya)

J & K
Sharad Pawar on Nehru: PM मोदींनी नेहरुंवर केलेल्या टीकेला शरद पवारांचं उत्तर; म्हणाले, योगदान नाही हा...

या अंदाधुंद गोळीबारात सिंग याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा परप्रांतीय नागरिक असलेल्या २५ वर्षीय रोहित नामक तरुण गंभीर जखमी झाला आहे. रोहित देखील अमृतसरचाच रहिवासी आहे. रोहितच्या पोटात गोळ्या लागल्या असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण परिसराला वेढा दिला असून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.