Shyam Saran Negi: मतदान ही प्रत्येका भारतीयाची मूलभूत गरज आहे, यापल्याड प्रत्येका नागरिकच हे कर्तव्य आहे की त्याने मतदान करावे. भारतात स्वातंत्र्या आधीही मतदान होत होतं, पण या मतदानाचे हक्क सर्वसामान्य लोकांना नव्हते; स्वतंत्र भारतात याला बदलत सर्वांसाठी मतदान करण्याचा हक्क खुला करण्यात आला.
स्वतंत्र्य भारताचे पहिले मतदान २५ ऑक्टोबर १९५१ रोजी झाले होते, या मतदानाच्या दिवशी सर्वात आधी मतदान करून पहिले मतदार श्याम सरण नेगी हे ठरले होते. हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथील मूळ रहिवाशी असलेल्या नेगी यांचे वय १०६ वर्ष होते.
भारताचे पहिले मतदार म्हणून नेगी यांनी २५ ऑक्टोबर १९५१ रोजी पहिल्यांदा मतदान केले होते. हिमाचलच्या किन्नोर जिल्ह्यातील एका शाळेतल्या मतदान केंद्रात जाऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. स्वातंत्र्यानंतर देशात लोकसभेसाठी २५ ऑक्टोबर १९५१ रोजी पहिल्यांदा मतदान झाले. या मतदानाच्या दिवशी आपला हक्क बजावणारा पहिला मतदार अशी त्यांची नोंद झाली आणि देशाचे पहिले मतदार म्हणून इतिहासाने त्यांची दखल घेतली. नेगी निवृत्त शिक्षक होते. त्यांचा जन्म १ जुलै १९१७ रोजी झाला, असे कागदोपत्री नोंदीतून स्पष्ट होते.
असा आहे किस्सा :-
सन १९५२मध्ये देशात प्रथम मतदान झाले. मात्र, हिमाचल प्रदेशातील आदिवासी आणि दुर्गम भागात त्या आधीच पाच महिने म्हणजे २३ ऑक्टोबर १९५१ रोजी मतदान झाले होते. खराब हवामानाचा फटका बसू नये, म्हणून ही उपाययोजना करण्यात आली होती. थंडीच्या काळात येथे मतदान करणे अशक्य बनले असते. त्यावेळी नेगी हे शाळेत शिक्षक होतो. त्यांना निवडणुकीचे काम देण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे मतदान असलेल्या कल्पा येथील प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर ते सकाळी सात वाजताच पोहोचलो होते. तेथेच त्यांनी मतदान केले. ते मतदान करणारे देशातील पहिले व्यक्ती होते. ही माहिती त्यांना नंतर समजली.
श्याम सरल नेगी यांनी आत्तापर्यंत ३३ वेळा मतदान केलं आहे. बॅलेट पेपर ते ईव्हीएमपर्यंतचा संपूर्म प्रवास त्यांनी अनुभवला आहे. श्याम सरण नेगी यांनी अलीकडेच मतदानासाठीचा १२-डी फॉर्म परत केल्यामुळं ते चर्चेत आले होते. प्रत्यक्षात मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार असल्याचं सांगत त्यांनी निवडणूक आयोगाचे फॉर्म परत केले होते. मात्र, त्याचदरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यांनी त्यांनी पोस्टल मतदान केलं. २ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी पोस्टल मतदान केलं होतं. तेच त्यांचे शेवटचे मतदान ठरलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.