Karnataka Election : मुख्यमंत्रीपदावरून वाद नाहीच ! कॉंग्रेसने आणला शिवकुमार-सिद्धरामय्या यांच्या दोस्तीचा Video

प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून तणावाचे संबंध असल्याची चर्चा आहे.
Siddaramaiah and DK Shivakumar Together
Siddaramaiah and DK Shivakumar Togetheresakal
Updated on
Summary

दोन्ही नेत्यांत कोणतेही मतभेद नसल्याचे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखविण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला आहे.

नवी दिल्ली : एका दिवसांवर कर्नाटकचे मतदान येऊन ठेपलेले असताना काँग्रेसचे (Congress) नेते आणि मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांचा एकत्र व्हिडिओ समोर आला आहे. दोन्ही नेत्यांत कोणतेही मतभेद नसल्याचे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखविण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला आहे.

Siddaramaiah and DK Shivakumar Together
Nana Patole : मुख्यमंत्री शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरतील; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा

कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून तणावाचे संबंध असल्याची चर्चा असताना काँग्रेसने अधिकृत ट्विटर हँडलवरून दोघांचा आनंदी मूडमध्ये असलेला व्हिडिओ जारी केला आहे.

Siddaramaiah and DK Shivakumar Together
Satara : राष्ट्रवादीनं गाफीलपणा सोडायला हवा, चूक दुरुस्त करण्याची वेळ आता पवारांची!

या व्हिडिओत दोघेही नेते एकमेकांची विचारपूस करताना आणि प्रचाराबाबत चर्चा करताना दिसतात. आठ मिनिटाच्या व्हिडिओत सिद्धरामय्या हे शिवकुमार यांना म्हणतात, की आपल्या आश्वासनावर जनता विश्वास ठेवेल. एकसंध काँग्रेस विधानसभा निवडणुकीत दीडशेपेक्षा अधिक जागा जिंकेल. शिवकुमारांसमवेत कोणतेही मतभेद नसल्याचे सिद्धरामय्या यांनी दावा केला. ते म्हणतात, की सध्याच्या एका सर्वेक्षणातून भाजपला ६२ पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत आणि जेडीएसला २०-२२ जागा मिळतील. काँग्रेसला किमान १४१ जागा मिळतील असे भाकीत त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.