उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसअध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वात कोणताही बदल झाल्यास या पदासाठी गृहमंत्री जी. परमेश्वर आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांचीही नावे चर्चेत आहेत.
बंगळूर : सध्या राज्यात मुख्यमंत्रिपद रिक्त नाही. त्यामुळे इच्छा असली तरी त्यावर कोणी आरूढ होऊ शकत नाही. मीच या पदावर कायम राहणार आहे. याबाबत कोणतीही शंका बाळगण्याचे कारण नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी बुधवारी ठामपणे सांगितले.