'हुकूमशाही वृत्तीतून राज्यघटना बदलण्याचे षड्‍यंत्र, हेगडेंची भाजपमधून हकालपट्टी करा'; मुख्यमंत्री आक्रमक

राज्यघटनेत (Constitution) कोणताही बदल करण्यासाठी सरकारला दोन तृतीयांश बहुमत आवश्यक आहे.
CM Siddaramaiah
CM Siddaramaiahesakal
Updated on
Summary

पंतप्रधान मोदींनी डॉ. आंबेडकरांची उघडपणे प्रशंसा केली आहे. राज्यघटना नसती तर पंतप्रधान झालो नसतो, असे ते म्हणाले.

बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी भाजपवर हुकुमशाहीचा आरोप करत राज्यघटना बदलण्याचा षड्‍यंत्र रचल्याचा आरोप केला. अन्न व नागरी पुरवठा विभाग, ग्राहक व्यवहार व मेट्रोलॉजी विभागातर्फे शहरातील अन्न भवनाच्या पायाभरणीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. त्यांनी खासदार अनंतकुमार हेगडे (Anantkumar Hegde) यांनी राज्यघटना बदलाबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

CM Siddaramaiah
Loksabha Election : शिवसेनेचा 'चंद्रहार' कोणाच्या गळ्यात? 'कोल्हापूर' काँग्रेसला सोडण्याच्या बदल्यात 'सांगली'ची दिली आहुती!

हेगडे केंद्रीय मंत्री असतानाही त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, ‘‘हे भाजपचे षड्‍यंत्र आहे. राज्यघटनेबाबत हेगडे विनाकारण बोलले आहेत. राज्यघटनेत (Constitution) कोणताही बदल करण्यासाठी सरकारला दोन तृतीयांश बहुमत आवश्यक आहे. देशाच्या आणि गरिबांच्या विकासासाठी भाजपला बहुमताची गरज नाही, तर राज्यघटना बदलण्यासाठी बहुमताची गरज आहे. मनुस्मृतिनुसार राजघटना असावी हा भाजपचा डाव आहे.

CM Siddaramaiah
Sangli Politics : काँग्रेसमध्ये बंड होणार? विश्‍वजित कदम यांच्यावर मोठी भिस्त, संशय बळावल्याने घडामोडीकडं भाजपचं लक्ष

त्यामुळे संपूर्ण देशातील गरीब, मागास आणि अल्पसंख्याकांनी भाजपच्या (BJP) या विचाराला विरोध केला पाहिजे. राजघटना बदलली तर या देशात रक्तपात होईल. त्यामुळे भाजप हा विचार अनंतकुमार हेगडे यांच्या माध्यमातून व्यक्त करत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर आज स्क्रिनिंग कमिटीची बैठक होत असून त्यात फक्त शिफारशी केल्या जातील, अशी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. याबाबत राष्ट्रीय निवडणूक समिती निर्णय घेईल.''

अन्न विभागासाठी स्वत:ची इमारत

अन्न विभागाच्या सर्व कार्यालयांचे कामकाज एकाच छताखाली करता यावे, यासाठी अन्न विभागाच्या स्वत:च्या इमारतीचे बांधकाम पूर्ण केले आहे. अन्न विभागामार्फत ‘अन्नभाग’ ही हमी योजना राबविण्यात येत आहे. अलियास्कर रस्त्यावरील मापन इमारतीच्या शेजारी असलेल्या ३० हजार चौरस फूट जागेवर ४९.०५ कोटी रुपये खर्च करून भोजन सुविधा उभारण्यात येत आहे. अंत्योदय, अन्नभाग्य योजनेंतर्गत १० लाख ८४ हजार ४०६ शिधापत्रिकाधारक, केंद्र सरकारच्या प्राधान्य कुटुंबात १ कोटी ०३ लाख ३८,००१ आणि राज्य सरकारच्या प्राधान्य कुटुंबात १३ लाख २१ हजार ४९२ शिधापत्रिकाधारक आहेत. ४५९५ कोटी रुपये (तांदळाच्या बदल्यात) जुलै ते जानेवारी अखेरपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. या कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठामंत्री के. एच. मुनियप्पा, नगरविकासमंत्री भैरती सुरेश आणि विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

CM Siddaramaiah
Loksabha Election : कोल्हापूरचा ग्राउंड रिपोर्ट थेट दिल्लीतून; प्रशांत किशोर-चाणक्य संस्थेकडून सर्व्हे, कोण मारणार बाजी?

‘हेगडेंची भाजपमधून हकालपट्टी करा’

राज्यघटनेबाबत अतिशय खालच्या दर्जाचे वक्तव्य करणारे खासदार अनंतकुमार हेगडे यांची भाजपमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी केली. पंतप्रधान मोदींनी डॉ. आंबेडकरांची उघडपणे प्रशंसा केली आहे. राज्यघटना नसती तर पंतप्रधान झालो नसतो, असे ते म्हणाले; मात्र त्यांच्या पक्षाचा एक खासदार वारंवार राज्यघटना बदलण्याची भाषा करत आहे, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.