Siddaramaiah : मुख्यमंत्रिपदाची अधिकृत घोषणा होताच सिद्धरामय्या म्हणाले, मला गुरे पाळण्यास..

प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि कर्नाटकचा अभिमान राखण्यासाठी मी अविरतपणे काम करत राहीन.
Congress Leader Siddaramaiah
Congress Leader Siddaramaiahesakal
Updated on
Summary

२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत १३५ जागा जिंकून भाजपच्या कारभाराला ब्रेक लावण्यात आम्ही अखेर यशस्वी झालो.

बंगळूर : कर्नाटकातील जनतेच्या हिताच्या रक्षणासाठी आमचे हात नेहमीच एकजूट असतील. लोकाभिमुख, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याबरोबरच आपल्या सर्व हमींची पूर्तता करण्यासाठी काँग्रेस पक्ष कुटुंबाप्रमाणे काम करेल, असे सिध्दरामय्या म्हणाले.

मुख्यमंत्रिपदाची अधिकृत घोषणा केल्यानंतर सिद्धरामय्या (Siddaramaiah) पक्षाच्या हमी घोषणेबद्दल स्पष्टपणे बोलले. ट्विटद्वारे त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या पाच हमी योजनांचाही या विजयात मोठा वाटा आहे. निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने (Congress) सर्वसामान्य जनता, गृहिणी, बेरोजगार, शेतकरी आदींना लक्ष्य करत पाच हमी योजना जाहीर केल्या. त्याची पूर्तता करण्याची आता मागणी होत आहे.

Congress Leader Siddaramaiah
Karnataka Election : विधानसभेत दिसणार 'पाटीलकी'; निवडणुकीत तब्बल 'इतक्या' पाटलांनी मिळवला विजय

एआयसीसीने त्यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केल्यानंतर, सिद्धरामय्या यांनी, प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि कर्नाटकचा अभिमान राखण्यासाठी मी अविरतपणे काम करत राहीन. आम्ही आमच्या हमींची अंमलबजावणी करण्यासाठी आणि आमच्या राज्यासाठी प्राधान्य देण्यासाठी वचनबद्ध आहोत, अशी प्रतिक्रीया व्यक्त केली.

सिद्धरामय्या यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘माझा जन्म म्हैसूर जिल्ह्यातील वरुणा होबळी येथील सिद्धरामण हुंडी येथे झाला. माझे कुटुंब प्रामुख्याने शेतीवर अवलंबून होते. ज्या काळात मॅट्रिक पास होणे कठीण होते, त्या काळात मी कुटुंबातील पहिला पदवीधर होतो. मी माझे बालपण सिद्धरामण हुंडीत घालवले. घरातील कठीण परिस्थितीमुळे मला माझे शिक्षण काही काळ बंद करावे लागले आणि त्यामुळे मला गुरे पाळण्यास सांगितले गेले; पण माझ्या गावातील शाळेतील शिक्षकांनी माझी आवड ओळखली.

Congress Leader Siddaramaiah
Political News : उपमुख्यमंत्रिपदी दलित नेत्याची निवड करा, अन्यथा..; डीकेंची निवड होताच बड्या नेत्याचा थेट इशारा

अभ्यास केला आणि मला थेट चौथी इयत्तेत प्रवेश मिळण्यास मदत केली. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणानंतर मी महाविद्यालयीन शिक्षणासाठी म्हैसूरला गेलो. म्हैसूरच्या युवराज कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला आणि बीएस्सी पदवी मिळविली. माझ्या वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावे, पण मी वेगळा मार्ग निवडला. तथापी, नियतीच्या इतर योजना होत्या कारण मी माझ्या स्वतःच्या स्वप्नांवर आणि कायद्याचा पाठपुरावा करू लागलो.

Congress Leader Siddaramaiah
Belgaum Election : मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित होताच 'या' आमदारांत मंत्रिपदासाठी लागली चुरस

शारदा विलास महाविद्यालयातून कायद्याची पदवी प्राप्त केल्यानंतर, विद्यावर्धक कॉलेजमधील अतिथी व्याख्याता म्हणून मी सेवा केली. प्रा. पी. एम. चिक्कबोरैया यांच्यासोबत कायदेशीर सराव सुरू केल्यानंतर, मी हळूहळू सार्वजनिक जीवनात प्रवेश केला आणि सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध लढण्यासाठी पुढाकार घ्यायला सुरुवात केली.

सुधारणांद्वारे सामाजिक न्याय मिळवण्याच्या माझ्या प्रयत्नामुळे मी कायदेशीर प्रॅक्टिस सोडून राजकारणात उडी घेतली. गरीबांना कोणत्या संकटांना तोंड द्यावे लागते हे मला माहीत आहे. मी स्वतः त्या अडचणी अनुभवल्या आहेत. म्हणूनच मी अन्न भाग्य (गरीबांना मोफत किंवा सवलतीच्या दरात अन्नधान्य उपलब्ध करून देणे), क्षीर भाग्य (दूध पुरवणे) आणि विद्यासिरी यासारख्या योजना सुरू केल्या होत्या.

Congress Leader Siddaramaiah
Atpadi Election : भाजप, राष्ट्रवादीला मोठा धक्का; शेवटच्या क्षणी शिवसेनेनं फिरवली बाजी

२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत १३५ जागा जिंकून भाजपच्या कारभाराला ब्रेक लावण्यात आम्ही अखेर यशस्वी झालो. प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि कर्नाटकचा अभिमान राखण्यासाठी मी अथक प्रयत्न करत राहीन. आम्ही आमच्या हमींची अंमलबजावणी करण्यासाठी आणि आमच्या राज्यासाठी प्राधझान्य देण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे ते पुढे म्हणाले. कर्नाटकाचे २४ वे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या शनिवारी शपथ घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.