Moose Wala : उत्तराखंडात यात्रेकरूंमध्ये लपलेले 6 संशयित ताब्यात

पकडण्यात आलेल्यांपैकी एकाचा या हत्येत सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे.
sidhu moose wala
sidhu moose wala Sakal
Updated on

नवी दिल्ली : गायक-राजकारणी बनलेल्या सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांच्या हत्येत मदत करणाऱ्यांना उत्तराखंडमधील (Uttarakhand) डेहराडूनमध्ये पकडण्यात आले असून, पंजाब पोलीस संबंधितांना घेऊन रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. पकडण्यात आलेल्यांपैकी एकाचा या हत्येत सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांना उत्तराखंड स्पेशल टास्क फोर्सच्या (STF) मदतीने पकडण्यात आले असून, हे सर्वजण लॉरेन्स बिश्नोई टोळीचे सदस्य असून त्यांना डेहराडूनमधील नया गाव चौकी येथे पकडण्यात आले आहे. (Sidhu Moose Wala Murder Suspected Detained From Uttarkhand)

sidhu moose wala
गायक मुसेवाला हत्या प्रकरणाची होणार न्यायालयीन चौकशी? सरकारचं हायकोर्टाला पत्र

या हत्येमध्ये एकाचा सहभाग असल्याचा संशय पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. हेमकुंड साहिबला जाणाऱ्या यात्रेकरूंमध्ये तो लपला होता. पंजाब आणि उत्तराखंड पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्याला ताब्यात घेतले. संशयिताला आता पंजाबला नेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

डेहराडूनमधून ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी एक लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) टोळीचा सदस्य असल्याचे सूत्रांनी सांगितले. या टोळीने गायक मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. याशिवाय उत्तराखंडमधून ताब्यात घेतलेल्या आणखी पाच संशयितांनाही पंजाबमध्ये नेले जात आहे.

sidhu moose wala
सिद्धू मुसेवाला कोण होता? जाणून घ्या त्याची वादग्रस्त कारकिर्द

मुसेवालाच्या हत्येचा संबंध तिहार तुरुंगाशी

पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर अधिकाऱ्यांनी दिल्लीच्या तिहार तुरुंगातील कैदी लॉरेन्स बिश्नोईच्या सेलमध्ये झडती घेतली आहे. या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोईची टोळी आणि कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रार यांनी घेतली आहे. त्यानंतर ही झडती घेण्यात आली आहे. या दरम्यान, अधिकाऱ्यांना काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या आहेत. दरम्यान, सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आल्याचे पोलीस महासंचालकांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()