नवी दिल्ली : भारतात सध्या कोरोनाचं संकट थैमान घालतंय. कोरोनाची पहिली लाट येऊन गेली. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट देखील अचानक आली आणि मोठं नुकसान देखील सोसावं लागलं. सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दलच्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर या संकटाला थोपवण्यासाठी सध्या लसीकरण हाच एकमेव मार्ग उपलब्ध आहे. भारतात सध्या ६ वेगवेगळ्या लशींच्या आपत्कालीन वापराला मंजूरी मिळाली आहे. यामध्ये कोविशील्ड, कोवॅक्सीन, स्पुटनिक व्ही, जॉन्सन अँड जॉन्सन, मॉडर्ना आणि झायडस कॅडिला या लशींचा समावेश आहे. देशात आतापर्यंत 64 कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण पार पडले आहे. सध्या सरकार लसीकरणाला आणखी गती देण्याच्या प्रयत्नात आहे. लोकांना लस मिळवण्यासाठी सोय व्हावी आणि सहजपणे ती उपलब्ध व्हावी, यासाठी आता एक मोठं पाऊल उचललं गेलं आहे.
आता कोरोना लस तुमच्या आसपास कुठे उपलब्ध आहे, याबाबतची माहिती सहजगत्या गुगल या सर्च इंजिनवरुन मिळवता येणार आहे. आधी ही माहिती फक्त कोविन पोर्टलवरच उपलब्ध होती. मात्र, आता ती मिळणे फारच सोपं होणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
कसे कराल सर्च?
गुगलवर 'covid vaccine near me' असं सर्च करा.
त्यानंतर लशींची उपलब्धता आणि इतर माहिती घ्या
त्यानंतर 'Book Appointment' हा पर्याय वापरा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.