Sikkim Avalanche News: सिक्कीममधील नाथूला सीमावर्ती भागात आज (मंगळवार) मोठा हिमस्खलन झालं. या घटनेत ६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. जवळपास ८० पर्यटक अडकल्याची भीती आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
मृतांमध्ये चार पुरुष, एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. हिमस्खलनानंतर गंगटोक ते नाथू ला जोडणाऱ्या १५ व्या मैल जवाहरलाल नेहरू मार्गावर बचावकार्य सुरू आहे.
बर्फात अडकलेल्या २२ पर्यटकांची सुटका करण्यात आली. त्यांना गंगटोक येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)
तसेच रस्ता मोकळा केल्यानंतर अडकलेल्या ३५० पर्यटकांची आणि ८० वाहनांची सुटका करण्यात आली.
भारत-चीन सीमेजवळील नाथू ला या उंच पर्वतीय खिंडीजवळ दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हिमस्खलन झालं. हिल पास समुद्रसपाटीपासून ४,३१० मीटर (१४,१४०फूट) उंचीवर आहे आणि एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. (Marathi Tajya Batmya)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.