Silkyara Tunnel Collapsed: "अडकलेले 41 कामगार ख्रिसमसपर्यंत घरी येणार"; बचाव पथकातील तज्ज्ञांचा नवा दावा

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा बोगदा कोसळल्यानं त्यात ४१ कामगार गेल्या १४ दिवसांपासून अडकून पडले आहेत.
rescue operation of 41 laborers trapped in Silkyara tunnel in Uttarakhand has reached its final stage
rescue operation of 41 laborers trapped in Silkyara tunnel in Uttarakhand has reached its final stageSakal
Updated on

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा बोगदा कोसळल्यानं त्यात ४१ कामगार गेल्या १४ दिवसांपासून अडकून पडले आहेत. त्यांच्या बचावासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

त्यातच इथं बचाव पथकात काम करणारे आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ आर्नोल्ड डिक्स यांनी चार दिवसांपूर्वीच या कामगारांना लवकरच बाहेर काढण्यात येईल असं सांगितलं होतं. पण आता ख्रिसमसपर्यंत ते आपल्या घरी परततील असं त्यांनी म्हटलं आहे. (trapped workers to come home by christmas tunnel expert on uttarakhand rescue team Arnold Dix)

rescue operation of 41 laborers trapped in Silkyara tunnel in Uttarakhand has reached its final stage
PMLA: ईडीची मोठी कारवाई! सुपरटेकविरोधातील मनी लाँड्रिंगचा तपास डीएलएफपर्यंत पोहोचला

ड्रिलिंगचं काम बंद

पत्रकारांशी बोलताना डिक्स म्हणाले की, ऑगर मशीन यापुढे काम करण्यात सक्षम नसल्यानं साइटवरील ड्रिलिंग आणि ऑजरिंग ऑपरेशन्स बंद करण्यात आली आहेत. आम्ही इतर अनेक पर्याय शोधत आहोत, या प्रत्येक प्रयत्नावेळी आम्ही अडकलेले सर्वजण सुखरुप घरी कसे येतील याचा विचार करत आहोत. सध्या ते सर्वजण सुरक्षित आहेत, असंही त्यांनी सांगितलं. (Marathi Tajya Batmya)

rescue operation of 41 laborers trapped in Silkyara tunnel in Uttarakhand has reached its final stage
Uttarkashi Tunnel Collapsed: "अडकलेले कामगार घरी परतणारच"; आंतरराष्ट्रीय टनेल एक्स्पर्टनं दिला विश्वास

पर्वतानं औगरला रोखल!

डिक्स पुढे म्हणाले, “इथल्या पर्वताच्या कठीण दगडानं पुन्हा एकदा औगरला विरोध केला आहे, म्हणून आम्ही आमच्या कामाचा पुनर्विचार करत आहोत. मला खात्री आहे की हे अडकलेले 41 कामगार ख्रिसमसपर्यंत घरी येतील” ते पुढे म्हणाले, अमेरिकन बनावटीची ऑगर मशीन पूर्णपणे बिघडली असून ती आता दुरुस्त करण्यायोग्य नाही. (Latest Marathi News)

rescue operation of 41 laborers trapped in Silkyara tunnel in Uttarakhand has reached its final stage
Soumya Viswanathan Murder Case: पत्रकार सौम्या हत्याकांडात शिक्षा जाहीर! चार आरोपींना दुहेरी जन्मठेप

हैदराबादहून बोलावली मशिन

दरम्यान, शनिवारी उत्तरकाशी इथं आलेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, बोगद्याच्या अगदी जवळ आल्यावर ऑगर मशीन अडकलं. मशीनची ब्लेड्स ढिगाऱ्यात अडकले होते आणि आता प्लाझ्मा कटरची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.

उद्या सकाळपर्यंत हे मशिन बाहेर पडेल आणि त्यानंतर, ऑपरेशन मॅन्युअली पुढे जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आम्ही सर्व पर्यायांवर काम करत आहोत. औगर मशीन कापण्यासाठी हैदराबादहून प्लाझ्मा कटर मशीन मागवण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.