जम्मू-काश्मीर: महत्त्वाची राजकीय घडामोड; केंद्राने बोलावली सर्वपक्षीय बैठक

जम्मू-काश्मीर: महत्त्वाची राजकीय घडामोड; केंद्राने बोलावली सर्वपक्षीय बैठक
Updated on

नवी दिल्ली : केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुकांसंदर्भातील हालचाली आता गतीमान झाल्या आहेत. केंद्र सरकारने सगळ्या राजकीय पक्षांची एक बैठक बोलावली आहे. ही बैठक 24 जून रोजी होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 ला रद्दबातल ठरवण्यात आलं होतं. यानुसार जम्मू-काश्मीरचा असलेला विशेष दर्जा संपुष्टात आणण्यात आला होता. यासोबतच जम्मू-काश्मीरचे विभाजन दोन केंद्र शासित प्रदेशांमध्ये करण्याची घोषणा करण्यात आली होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच या प्रकारची होणारी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या सर्वपक्षीय बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच इतर अनेक केंद्रीय नेते समाविष्ट होण्याची शक्यता आहे.

जम्मू-काश्मीर: महत्त्वाची राजकीय घडामोड; केंद्राने बोलावली सर्वपक्षीय बैठक
रोखणं अशक्य! दोन महिन्यात धडकणार कोरोनाची तिसरी लाट

केंद्र सरकारने नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुक अब्दुल्ला, पीडीपी अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती, जम्मू-काश्मीर अपनी पार्टी (JKAP) चे अल्ताफ बुखारी आणि पीपल्स कॉन्फरन्सचे प्रमुख सज्जाद लोन यांना चर्चा करण्यासाठी आमंत्रण देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टी (PDP)चे अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलंय की, होय मला फोन आला होता मात्र, अधिकृत निमंत्रण आलेलं नाहीये. आम्ही उद्या यासंदर्भात बैठक घेऊन निर्णय घेऊ की या बैठकीत सामील व्हायचं की नाही.

जम्मू-काश्मीर: महत्त्वाची राजकीय घडामोड; केंद्राने बोलावली सर्वपक्षीय बैठक
अँटीबॉडीजमुळे लहान मुले सुरक्षित; तिसऱ्या लाटेचा धोका कमी

चर्चेसाठी तयार

केंद्राशी चर्चेच्या शक्यतेबाबत विचारले असता माकपचे नेते आणि पीपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लेरेशन (पीएजीडी) चे प्रवक्ते एम.वाय. तारिगामी म्हणाल्या, “आम्ही केंद्राशी चर्चेसाठी आमची दारे कधीच बंद केलेली नाहीयेत. अद्याप तरी मला कोणत्याही प्रकारच्या बैठकीची माहिती नाही, मात्र जर तसे काही झाले तर ते स्वागतार्हच आहे.

गतवर्षी जिल्हा परिषदेच्या निवडणुका

गेल्या वर्षी झालेल्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत, पीएजीडीने भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांपेक्षा 280 जागांपैकी 110 जागा जिंकल्या आणि नॅशनल कॉन्फरन्स युतीतील 67 जागा जिंकल्या. भाजपा 75 जागा मिळविणारा सर्वात मोठा पक्ष होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.