दारू घोटाळ्यात सिसोदिया आरोपी, पण सुत्रधार केजरीवाल; अनुराग ठाकूर यांचा आरोप

Arvind Kejriwa and Manish Sisodia
Arvind Kejriwa and Manish Sisodia
Updated on

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी शनिवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर जोरदार टीका केली. उत्पादन शुल्क घोटाळ्यात आम आदमी पार्टीचे मंत्री हे नंबर एकचे आरोपी असू शकतात. परंतु सुत्रधार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला.

Arvind Kejriwa and Manish Sisodia
मी एकटा मुख्यमंत्री नाही तर तुम्ही सगळेजण मुख्यमंत्री आहात - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अनुराग ठाकूर यांनी सिसोदिया यांच्यावर हल्लाबोल करताना म्हटलं की, आजच्या पत्रकार परिषदेत घोटाळ्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील रंग उडाला होता. ते स्पष्टपणे दिसून आलं. ते कोणत्याही प्रश्नाचे उत्तरही देऊ शकले नाहीत. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी ‘देशासमोर येऊन २४ तासांत उत्तर द्यावे’, असे आव्हानही ठाकूर यांनी दिले.

ठाकूर यांनी मनीष सिसोदिया यांच्यावर ताशेरे ओढले. दिल्लीच्या शिक्षणमंत्र्यांनी त्यांच्या नावाचे स्पेलिंग बदलून "MONEY SHH" केले असावे कारण ते फक्त पैसे घेतात आणि गप्प बसतात.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यात होणार असल्याच्या सिसोदिया यांच्या दाव्याला उत्तर दिले. ते म्हणाले, "2024 च्या निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल विरोधी चेहरा असल्यास भाजपसाठी चांगले आहे. भाजपचा एकतर्फी विजय होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.