भरधाव मोटारीने थांबलेल्या ट्रकला मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चौघे जागीच ठार, तर तीन मुले गंभीर जखमी झाली आहेत.
बेळगाव : आपल्या बहिणीला सोडण्यासाठी तुमकूरला निघालेल्या विष्णू गल्ली वडगाव येथील शमशुद्दीन शेख व त्यांच्या बहिणीचे अपघातात (Road Accident) निधन झाले. त्यामुळे शमशुद्दीन यांचा बहिणीसोबतचा प्रवास अखेरचा ठरला.
विष्णू गल्ली येथील शमशुद्दीन शेख यांची बहीण मलिका खलील या तुमकूरला राहत होत्या. काही दिवसांपूर्वी आपल्या पती व मुलासमवेत त्या बेळगावला आल्या होत्या. त्यामुळे शमशुद्दीन यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण होते.
सर्वांची भेट झाल्यानंतर मलिका आपल्या कुटुंबासह आपला भाऊ शमशुद्दीन व भाचा तबरेज यांच्यासमवेत रविवारी रात्री तुमकूरसाठी रवाना झाल्या होत्या. पहाटे त्यांच्या वाहनाला अपघात झाला आणि काही वेळातच होत्याचे नव्हते झाले.
पहाटेच्या वेळी अपघात झाला. मात्र, अपघाताची माहिती उशिरा मिळाली. त्यामुळे अपघातात कोण ठार झाले आहे, याची माहिती घेण्यासाठी अनेकांनी हाकिमने त्यांच्या घराकडे धाव घेतली होती. बहीण, बहिणीचा नवरा आणि शमशुद्दीन व त्यांच्या मुलाचे अपघाती निधन झाल्याची माहिती मिळताच विष्णू गल्लीत माहिती घेण्यासाठी एकच गर्दी झाली होती.
बहीण आणि भावाचा हा प्रवास असा दुःखदायक होईल, याची कुणालाही कल्पना नव्हती. यामुळे वडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करताना अनेकदा डोळ्यावर झापड आल्याने अपघात घडत असतात. त्यामुळे काही वेळ विश्रांती घेऊन पुढील प्रवास करणे चांगले असते, असे मतही अनेकांनी या अपघातानंतर व्यक्त केले.
महामार्गांवर जागा मिळेल त्या ठिकाणी अवजड वाहने लावण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या वाहनांचा अंदाज न आल्याने अपघातात वाढ होत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करताना सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक बनले आहे.
भरधाव मोटारीने थांबलेल्या ट्रकला मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चौघे जागीच ठार, तर तीन मुले गंभीर जखमी झाली आहेत. सोमवारी (ता. ४) सकाळी ७.१५ च्या दरम्यान पुणे-बंगळूर महामार्गावरील चित्रदुर्गजवळ ही घटना घडली. मृतांपैकी दोघे बाप-लेक विष्णू गल्ली वडगाव येथील असून, दोघे पती-पत्नी तुमकूर येथील आहेत. तिन्ही जखमी मुलांवर चित्रदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती देखील चिंताजनक आहे. अपघाताची नोंद चित्रदुर्ग ग्रामीण पोलिस (Chitradurga Rural Police) ठाण्यात झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.