MP Prajwal Revanna
MP Prajwal Revannaesakal

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

गेल्या २० दिवसांपासून प्रज्वल रेवण्णा एसआयटी अधिकाऱ्यांना हुलकावणी देत आहे.
Published on
Summary

खासदार असल्याने प्रज्वल यांनी डिप्लोमॅटिक पासपोर्ट वापरून परदेशात प्रवास केला आहे. त्यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याची मागणीही केली आहे.

बंगळूर : अश्‍लील व्हिडिओच्या पेन ड्राईव्ह प्रकरणातील (Obscene Video Pen Drive Case) मुख्य आरोपी आणि परदेशात पळून गेलेले हासनचे खासदार प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) बुधवारी भारतात येतील, अशी अपेक्षा करून विशेष तपास संस्था (SIT) हतबल झाली आहे.

गेल्या २० दिवसांपासून प्रज्वल रेवण्णा एसआयटी अधिकाऱ्यांना हुलकावणी देत आहे. भारतात परतण्यासाठी ३ मे ते बुधवार १५ मेपर्यंत बुक केलेल्या विमानाची पाच तिकिटे शेवटच्या क्षणी रद्द केली आहेत. प्रज्वल परत येईल, अशी विमानतळावर प्रतीक्षा करणाऱ्या एसआयटी अधिकाऱ्यांची अपेक्षा फोल ठरली. एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी प्रज्वलला सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी आधीच नोटीस बजावली होती. त्यानंतर ‘लुकआऊट’ नोटीस जारी करण्यात आली.

MP Prajwal Revanna
Crime News : प्रेम प्रकरणातून तरुणाचा स्क्रू ड्रायव्हरने खून; बहिणीसमोरच भररस्त्यात प्रियकराला भोसकले

त्यानंतर ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ (Blue Corner Notice) बजावण्यात आली. आता प्रज्वल यांना भारतात आणण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ‘रेड कॉर्नर नोटीस’ (Red Corner Notice) जारी करणे हा आहे. ‘रेड कॉर्नर नोटीस’ लागू करणे ही सोपी प्रक्रिया नाही. प्रज्वल यांना अटक न केल्याने फरार झाल्याचे आरोपपत्र न्यायालयात सादर करावे लागणार आहे. त्यानंतर न्यायालय आरोपींना खटल्याला उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले. या प्रकरणात एसआयटी परदेशात लपलेल्या आरोपींची माहिती देईल.

न्यायालयाच्या समन्सकडे दुर्लक्ष केल्यास प्रज्वल यांचा शोध घेण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेतली जाईल. त्यानंतर एसआयटी ‘रेड कॉर्नर नोटीस’ जारी करण्याची सीबीआयला विनंती करू शकते. त्यानंतर सीबीआय इंटरपोलच्या माध्यमातून ‘रेड कॉर्नर नोटीस’ जारी करेल. ही नोटीस लागू झाल्यास प्रज्वल यांना संबंधित देशातील स्थानिक पोलिस त्यांना ताब्यात घेतात. अटक केल्यानंतर त्या देशाचे पोलिस त्याला भारताच्या ताब्यात देतील. या सर्व प्रक्रियेसाठी एसआयटीला किमान ४० दिवस लागतील.

MP Prajwal Revanna
Sangli Crime : गुंगीचे औषध देऊन कॅफेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; 'शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान'कडून कॅफेची तोडफोड

गेल्या २० दिवसांपासून परदेशात पळून गेलेले प्रज्वल बुधवारी जर्मनीहून बंगळूर विमानतळावर पोचणार होते. एसआयटी अधिकाऱ्यांनी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांच्या प्रतीक्षेत तळ ठोकला होता आणि प्रज्वलला अटक करण्यासाठी सर्व तयारी केली होती. जर्मनीतील म्युनिक येथून त्यांनी विमानाचे तिकीटही काढले होते. लुफ्थांसा एअरलाइन्समध्ये प्रज्वल मध्यरात्री १२.३० च्या सुमारास येणार होते. त्यानंतर ब्रिटिश एअरलाइन्सच्या विमानातूनही प्रज्वल येतील, अशी माहिती मिळाल्यामुळे पोलिसांनी पहाटे पाच वाजेपर्यंत त्यांची वाट पाहिली. मात्र दोन्ही फ्लाइटमझून प्रज्वल न आल्याने पोलिस रिकाम्या हाताने परतले.

MP Prajwal Revanna
Pakistan Espionage Case : पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी फरार मुख्य आरोपीला अटक; NIA ची कर्नाटकात मोठी कारवाई

‘डिप्लोमॅटिक पासपोर्ट’ रद्द करता येत नाही

खासदार असल्याने प्रज्वल यांनी डिप्लोमॅटिक पासपोर्ट वापरून परदेशात प्रवास केला आहे. त्यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याची मागणीही केली आहे, मात्र हा पासपोर्ट इतक्या सहजासहजी रद्द करता येणार नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरच परराष्ट्र मंत्रालय पासपोर्ट रद्द करू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.