मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांची रविवारी सलग तिसऱ्यांदा पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली. पक्षाच्या सर्वोच्च पदावर निवडून आल्यानंतर 23 व्या माकपच्या अधिवेशनात प्रतिनिधींना संबोधित करताना सीपीआय(एम) चे मुख्य उद्दिष्ट हे फॅसिस्ट RSS चा हिंदुत्वाचा जातीय अजेंडा चालवणाऱ्या भाजपला एकाकी पाडून पराभूत करणे आहे, असा घणाघात येचुरी यांनी केला.
ते म्हणाले की, भगव्या पक्षाला एकटे पाडणे आणि पराभूत करणे केवळ मानवी स्वातंत्र्याची प्रगती करण्यासाठीच नाही तर भारताला धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक म्हणून वाचवण्यासाठी देखील आवश्यक आहे. दरम्यान पक्षाच्या अधिवेशनात पॉलिट ब्युरोचे 17 सदस्य आणि केंद्रीय समितीचे 85 सदस्य निवडले गेले, जे पुढील तीन वर्षांसाठी काम पाहातील.
पश्चिम बंगालचे ज्येष्ठ नेते राम चंद्र डोम यांना केंद्रीय समितीच्या सदस्य पदावरून पॉलिट ब्युरोच्या सदस्यपदी बढती देण्यात आली आहे. यासह ते पॉलिट ब्युरोमधील पहिले दलित प्रतिनिधी ठरले आहेत. माकपच्या पॉलिटब्युरोमध्ये दोन नवीन चेहऱ्यांना स्थान मिळाले आहे, ज्यात केरळमधील डाव्या लोकशाही आघाडीचे (एलडीएफ) चे संयोजक ए विजयराघवन आणि अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांचा समावेश आहे.
दरम्यान, ज्येष्ठ नेते एस रामचंद्रन पिल्लई, बिमन बोस आणि हन्नान मोल्ला यांना 75 वर्षांपेक्षा जास्त वयामुळे पॉलिट ब्युरोमधून काढून टाकण्यात आले आहे. मात्र, ते केंद्रीय समितीचे विशेष निमंत्रित सदस्य असतील. 85 सदस्यीय माकपच्या केंद्रीय समितीमध्ये 17 नवीन चेहऱ्यांना स्थान दिले आहे तर 15 महिला सदस्य आहेत. यासह पक्षाच्या पाच दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाची रविवारी कन्नूर येथील रॅलीने सांगता झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.