Accident News: हैदराबादला जाणाऱ्या बसला आग लागल्याने सहा जणांचा मृत्यू, बस जळून खाक

Accident News: आंध्र प्रदेशातील पालनाडू जिल्ह्यात एका बसची लॉरीला धडक बसून झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी बुधवारी सांगितले.
 Hyderabad-bus and lorry caught fire
Hyderabad-bus and lorry caught fireesakal
Updated on

Accident News:

तेलंगणा: बापटला जिल्ह्यातील चिन्नागंजम येथून हैदराबादला जाणाऱ्या बसची चिल्कलुरीपेटच्या वरिपलेम डोणका येथे हायवाला धडक होऊन बस आणि हायवाला आग लागल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. जखमींना पुढील उपचारासाठी गुंटूर येथे हलविण्यात आले.चिलकलुरीपेटा ग्रामीण पोलीस स्टेशनने याबाबत माहिती दिली आहे. 

जखमींवर चिलाकालुरीपेट शहरातील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गुंटूरला रेफर करण्यात आले. अंजी (३५), उपगुंडुर काशी (६५), उपगुंडूर लक्ष्मी (५५) आणि मुप्पाराजू ख्याती सैश्री (८, सर्व रा. बापटला, आंध्र प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. अन्य दोन मृतांची ओळख पटवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

जखमी लोकांनी सांगितले की सोमवारी मतदान केल्यानंतर एकूण 42 लोक बसमध्ये प्रवास करत होते. त्यापैकी एक हायवा ड्रायव्हर, एक बस ड्रायव्हर आणि इतर चार जण जागीच मरण पावले. (road accident News in Marathi)

 Hyderabad-bus and lorry caught fire
Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत सापडले आणखी दोन मृतदेह! 14 वरून आकडा पोहचला 16 वर... काही जण  अडकल्याची भिती

या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पालनाडू जिल्ह्यातील चिलाकालुरीपेट मंडल येथे हा अपघात झाला. बापटला जिल्ह्यातील चिन्नागंजम या मंडळातून बस हैदराबादला जात असताना हायवला धडकली. या अपघातात दोन्ही वाहनांचे पूर्णपणे नुकसान झाले, असे पोलिसांनी सांगितले.

 Hyderabad-bus and lorry caught fire
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी माजी पत्रकाराला अटक, ३ दिवसांची पोलीस कोठडी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com