Child Sale Crime : अडीच महिन्याच्या बाळाची चार लाखाला विक्री; डॉक्टरसह सहा जणांना अटक, बनावट दाखले जप्त

Bangalore Crime : जया आणि प्रशांतने २६ ऑगस्ट रोजी बालकाचा जन्म झाल्याचे कागदपत्र तयार केल्याचे आढळून आले.
Bangalore Crime
Bangalore Crimeesakal
Updated on
Summary

आरोपींविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक उमा प्रशांत यांनी दिली.

बंगळूर : बनावट कागदपत्रे तयार करून बालकाची चार लाख रुपयांना विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत जिल्हा बाल संरक्षण शाखा व महिला ठाण्याच्या पोलिसांनी (Police) डॉक्टरसह (Doctor) सहा आरोपींना अटक केली.

दावणगेरे येथील एम. के. मेमोरियल हॉस्पिटलमधील डॉ. भारती, बालकाची आई काव्या, बालक विकत घेणारे दांपत्य जया आणि प्रशांतकुमार तसेच मध्यस्थ वादीराज आणि मंजम्मा यांना अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. अडीच महिन्यांच्या बालकाला बाल संगोपन केंद्रात आश्रय देण्यात आला आहे.

Bangalore Crime
मोठी बातमी! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून बालाजी मंदिर हटवले; भाविकांतून तीव्र नाराजी, मंदिराला आहे 700 वर्षांपूर्वीचा इतिहास

चाईल्ड हेल्पलाईनवर कॉल करून निनावी व्यक्तीने माहिती दिली की, काव्याच्या एका बालकाची जया आणि प्रशांतकुमार कुरुडेकर यांना एम. के. मेमोरियल हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉ. भारती यांनी मध्यस्थ वादीराज आणि मंजम्मा यांच्यामार्फत विक्री केली आहे. या माहितीच्या आधारे जिल्हा बाल संरक्षण शाखेच्या टी. एन. कविता आणि त्यांच्या पथकाने विनोबानगर येथील जया आणि प्रशांतकुमार यांच्या घरी जाऊन तपासणी केली. यावेळी जन्म दाखल्यासह अनेक बनावट दाखले जप्त करण्यात आले.

Bangalore Crime
'शरद पवारांनी जातीजातींत भांडणं लावली, आता त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करण्याची वेळ आलीये'; पडळकरांचा जोरदार निशाणा

जया आणि प्रशांतने २६ ऑगस्ट रोजी बालकाचा जन्म झाल्याचे कागदपत्र तयार केल्याचे आढळून आले. कागदपत्रांच्या आधारे पथकाने रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता बालकाच्या विक्रीच्या प्रकरणाची पुष्टी झाली. पतीपासून घटस्फोट घेतलेल्या काव्याने काही महिन्यांपूर्वीच मुलाला जन्म दिला. नंतर तिने मुलाला विकण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या सात वर्षांनंतरही जया आणि प्रशांत यांना मूलबाळ झाले नाही. काव्याने डॉक्टर, मध्यस्थ वादीराज यांच्यामार्फत चार लाख रुपयांना बालक विकले.

'सांभाळणे शक्य नसल्याने...'

आरोपीविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक उमा प्रशांत यांनी दिली. चौकशीत मुलाची आई काव्याने सांगितले की, तिला सांभाळणे शक्य नसल्याने तिने मुलाला विकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.