Crime News : मृत्यूचे तांडव! जमिनीच्या वादातून 6 जणांची हत्या; एकाचा बदला घेण्यासाठी पाच जणांना संपवलं, परिसरात दहशत

उत्तर प्रदेशातील देवरिया येथे जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
six people killed in up deoria over property dispute
six people killed in up deoria over property dispute
Updated on

उत्तर प्रदेशातील देवरिया येथे जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या भांडणादरम्यान गोळीबार आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या घटनेत काही लोक जखमीही झाले आहेत. घटनेनंतर तत्काळ परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात असून एसपी, डीएमसह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार देवरिया जिल्ह्यातील रुद्रपूर पोलीस स्टेशन हद्दीतील फतेहपूर गावात ही घटना घडली. येथे राहणारे सत्य प्रकाश दुबे आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रेम यादव यांच्यात अनेक दिवसांपासून जमिनीवरून वाद सुरू होता. या दोघांमध्ये सतत भांडण होत असत.

मिळालेल्या माहितीनुसार १ ऑक्टोबर रोजी सकाळी प्रेम यादवचा मृतदेह सापडला. धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. ही हत्या कोणी केली याबाबत माहिती मिळालेली नाहीये. दरम्यान संशयाच्या आधारावर प्रेम यादवच्या संतप्त कुटुंबीयांनी सकाळी साडेसातच्या सुमारास सत्य प्रकाश दुबे यांच्या घरात घुसून गोळीबार केला. यावेळी गोळी लागल्याने कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला.

six people killed in up deoria over property dispute
Maratha Reservation : "...मग मलाच एकट्याला का बोलता?"; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळांचा मनोज जरांगेना सवाल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृत्यू झालेल्यांमध्ये सत्य प्रकाश दुबे, त्यांची पत्नी किरण, मुलगी सलोनी, नंदनी आणि मुलगा गांधी यांचा समावेश आहे. आता कुटुंबात फक्त 8 वर्षांचा मुलगा राहिला आहे. हल्लेखोरांनी त्यालाही बेदम मारहाण केली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पाच जणांच्या हत्येत धारदार शस्त्रांचा वापर झाल्याची माहितीही समोर आली आहे. दरम्यान या घटनेशी संबंधित फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

यूपी डीजीपी कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हत्येमध्ये सहभागी असलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी काही जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. गावात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

six people killed in up deoria over property dispute
Sharad Pawar : NCPच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर दावा सांगणाऱ्या अजित पवार गटाला शरद पवारांचे उत्तर; म्हणाले...

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी व्यक्त केलं दु:ख

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या. यासोबतच त्यांनी गुन्हेगारांना सोडलं जाणार नाही असेही म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.