Surat Building Collapses: सूरतमध्ये 2017 मध्ये बांधलेली सहा मजली इमारत कोसळली! 7 जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले

Six storey building collapses Surat: मृत्यूचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरु आहे.
Surat building
Surat building
Updated on

गांधीनगर- सूरतच्या सचिन भागामध्ये मोठा अपघात झाला आहे. एक सहा मजली इमारत कोसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरु आहे.

इमारत कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन अधिकारी घटनास्थळी आले होते. अग्निशमन दलाच्या गाड्या देखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मदतकार्य सुरू करण्यात आल्यानंतर सात मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. आणखी काहीजण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती मिळत आहे.

Surat building
Sangli Bus Accident: मुंबईकडे जाणारी आरामबस सांगलीत झाडाला आदळली, चालकाच्या केबिनमध्ये वटवाघूळ घुसल्याने अपघात

सूरत महानगर पालिकेचे महापौर दक्षेश मावानी, उपमहापौर नरेंद्र पाटील, भाजप आमदार संदीप देसाई आणि विरोधी नेता पायल साकरिया यांच्यासह इतर काही नेते घटनास्थळी आले होते. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. माहितीनुसार, इमारतीच्या पाच फ्लॅटमध्ये लोक राहत होते. एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

Surat building
Nashik Accident News : गंगापूर धरणाजवळ कथडा तोडून कार नदीपात्रात! अपघातात एक ठार; दोघे जखमी

पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इमारत २०१७ मध्ये बनवण्यात आली होती. लगेच २०२४ मध्ये इमारत कोसळली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इमारतीमध्ये एकूण ३२ फ्लॅट आहेत. यामध्ये जास्त करून भाड्याने राहणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यात मजुरांची संख्या जास्त आहे. या प्रकरणी प्रशासनाकडून नोटीस जारी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.