Parliament Security Breach: संसदेत घुसखोरी करणाऱ्या सहाव्या आरोपीचीही ओळख पटली; जाणून घ्या कोण आहे ललित झा?

लोकसभा सुरक्षा भंग प्रकरणातील सहाव्या व्यक्तीचीही ओळख पटली आहे. मात्र, तो सध्या फरार आहे. या घटनेचा व्हिडिओ त्याने आपल्या सहकाऱ्याला व्हॉट्सअॅपवर पाठवला होता
Parliament Security Breach
Parliament Security BreachEsakal
Updated on

लोकसभा सुरक्षा भंग प्रकरणातील सहाव्या व्यक्तीचीही ओळख पटली आहे. मात्र, तो सध्या फरार आहे. या घटनेचा व्हिडिओ त्याने आपल्या सहकाऱ्याला व्हॉट्सअॅपवर दुपारी एक ते दोनच्या दरम्यान पाठवला होता. हल्ल्यानंतर आरोपी ललित झा याने लगेचच त्याच्या साथीदाराशी संपर्क साधला. त्यांचा सहकारी पश्चिम बंगालमधील एका एनजीओचा संस्थापक आणि विद्यार्थी आहे. नीलाक्ष आइच असे त्याचे नाव आहे.(Latest Marathi News)

इंडिया टुडे टीव्हीच्या वृत्तानुसार नीलाक्ष आइच याने सांगितले की, "ललितने मला कॉल केला नाही, पण संसदेबाहेरील रस्त्यावर धूर पसरवणाऱ्या आंदोलकांचा व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ पाठवला. त्याने मला दुपारी 1-2 वाजता व्हिडिओ पाठवले, तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो. मी नंतर माझा फोन पाहिला तेव्हा मी त्याला याबद्दल विचारले". (Marathi Tajya Batmya)

Parliament Security Breach
Parliament Security Breach: संसदेतील घुसखोरीच्या घटनेनंतर सुरक्षेबाबत UAPA अंतर्गत गुन्हा दाखल; दिल्ली पोलिसांचा विशेष कक्ष करणार तपास

ललित झा हा हल्ल्याचा मास्टरमाईंड मानला जातो. तो एक सामाजिक कार्यकर्ता आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, तो बंगालमधील एका एनजीओशी संबंधित आहे. ललित झा याने त्यांच्या साथीदारांना सांगितले की, त्यांनी ग्रामीण बंगालमध्ये, विशेषत: पुरुलिया आणि झारग्राम जिल्ह्यात सक्रिय नेटवर्क बनवले आहे.

ललित झा याचे एनजीओ सहयोगी निलाक्ष आइच यानी इंडिया टुडे टीव्हीला सांगितले की, दोघे कोलकाता येथे एका कार्यक्रमात पहिल्यांदा भेटले होते. आइच म्हणाले, "ललित झा याने स्वत:ची ओळख एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून करून दिली त्याला मागासवर्गीयांसाठी सामाजिक कार्य करायला आवडते. याशिवाय त्यांनी स्वत:बद्दल काहीही उघड केले नाही."(Latest Marathi News)

Parliament Security Breach
Parliament Security Breach: एकमेकांना ओळखतात, नियोजनबद्ध पद्धतीनं केलं काम; पोलिसांची खळबळजनक माहिती

ललित झा याने आइचच्या एनजीओ सम्यबादी सुभाष सभेचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे. ललित झा याला हे पद देण्याबाबत बोलताना आइच म्हणाला, "जे लोक आमच्या संस्थेचा भाग आहेत ते महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. अनेकदा झारग्राम आणि पुरुलियासारख्या ग्रामीण भागात कामासाठी आम्ही तिथे जाऊ शकत नाही. ललित झा म्हणाला, की मी त्या ठिकाणी जाऊन काम करेन." (Marathi Tajya Batmya)

ललित झा यांनी हल्ल्याशी संबंधित त्यांच्या योजनांबद्दल काही संकेत दिले आहेत का, असे विचारले असता, आइच म्हणाला की त्यांनी त्याचा थेट उल्लेख केला नाही. "आम्ही डिसेंबरमध्ये एका बैठकीची आयोजन केले होते. त्यासंदर्भात तो म्हणाला की ही बैठक 12 डिसेंबरपूर्वी घ्यावी."(Latest Marathi News)

ललित झा सतत फोन नंबर बदलतो

आइचने दिलेल्या माहितीनुसार, ललित झा याचा पत्ता आणि वय याबद्दल संघटनेकडे कोणतीही माहिती नाही. यामुळेच त्याला संस्थेचे सदस्यत्व कार्ड देण्यात आले नाही. ललित झा दोन मोबाईल नंबर्समध्ये स्विच करत राहतो. जेव्हा तो एक नंबर वापरतो तेव्हा त्याचा दुसरा नंबर बंद असतो.

आइच याच्या म्हणण्यानुसार, ललित झा यांचे वय 25-35 वर्षांच्या दरम्यान असल्याचे दिसते. ललित झा याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध आहे का, असे विचारले असता, आइच म्हणाला की, भविष्यात त्यांची एनजीओ राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्याची शक्यता आहे का, असे त्यानी एकदा विचारले होते. (Marathi Tajya Batmya)

Parliament Security Breach
Parliament Security Breach: "आम्हाला वाटलं आता चप्पला मारतील..."; लोकसभेत घुसखोरांना पकडणाऱ्या खासदाराने सांगितली संपूर्ण घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()