न्यूयॉर्क : आमसभेसाठी न्यूयॉर्कमध्ये आलेल्या अनेक छोट्या देशांच्या प्रमुखांनी लस वितरणात असलेल्या असामनतेवर आपल्या भाषणातून बोट ठेवले. कोरोना संसर्ग अद्याप आटोक्यात आलेला नसतानाही छोट्या देशांना लस पुरविण्याकडे अनेक श्रीमंत देशांचे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी या नेत्यांनी बोलून दाखविली. कोरोना स्थितीमुळेच यापैकी अनेक नेत्यांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातूनच भाषण करावे लागले. बड्या देशांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झालेले असताना गरीब देशांना लसच मिळाली नसल्याने लोकांचे आयुष्य धोक्यात आले असल्याचे या नेत्यांनी सांगितले. युरोपमध्ये निम्म्या लोकसंख्येला लशीचे दोन्ही डोस मिळाले असताना आफ्रिका खंडात हेच प्रमाण वीस व्यक्तींमागे एक असे आहे. दक्षिण आफ्रिका, बोट्सवाना, अंगोला, बुर्किना फासो, झिम्बाब्वे आणि लीबिया या देशांच्या प्रमुखांची आज भाषणे झाली.
लस पुरवठा वाढविणार : बायडेन
फायझर कंपनीने विकसीत केलेल्या कोरोना प्रतिबंधक लशीचे एकूण अब्ज डोस विकत घेऊन त्यांचा जगभरात पुरवठा करण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी घेतला आहे. पुढील वर्षाच्या अखेरीपर्यंत जगभरातील ७० जनतेचे लसीकरण पूर्ण करण्याचे नवे उद्दीष्ट अमेरिकेने समोर ठेवले आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी श्रीमंत देशांनी पुढे यावे, असे आवाहनही बायडेन यांनी केले आहे. अमेरिकेने आतापर्यंत जगभरात लशीचे १६ कोटी डोस वितरीत केले आहेत. जगातील इतर सर्व देशांनी मिळून आतापर्यंत देणगी म्हणून दिलेल्या लशींपेक्षाही एकट्या अमेरिकेने अधिक संख्येने लशींचे वाटप केले आहे.
तालिबानने आश्वासन पाळावे : जयशंकर
अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होऊ न देण्याचे तालिबानने दिलेले आश्वासन त्यांनी पाळावे, असे आवाहन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज केले. जयशंकर यांनी आज जी-२० देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत अफगानिस्तानच्या मुद्द्यावर चर्चा केली. ‘अफगाणिस्तानमध्ये मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र येणे आवश्यक आहे. मात्र, अफगानिस्तानमध्ये दिली जाणारी मदत कोणताही भेदभाव न होता, कोणतेही निर्बंध न येता थेटपणे पोहोचणे आवश्यक आहे. अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक सरकार स्थापन व्हावे, अशी जगाची इच्छा आहे,’ असे जयशंकर म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.