नवी दिल्ली : काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आता वेगळ्या प्रकारचे राजकारण करत आहेत. आपण यशाची चव चाखली आहे, असे त्यांना वाटते. ते नव्याने राजकीय डावपेच आखत आहेत, असे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केले आहे..लोकसभा निवडणुकीत अमेठीतून इराणी यांनी २०१९ मध्ये राहुल गांधी यांचा पराभव केला होता. मात्र, यंदा काँग्रेसच्या किशोरीलाल शर्मा यांनी अमेठीतून इराणी यांचा पराभव करत परतफेड केली..पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी राहुल गांधी यांच्या राजकारणावर भाष्य केले. त्या म्हणाल्या, की राहुल गांधी जातीबद्दल बोलतात. पांढरा टी शर्ट परिधान करतात. यातून युवकांना कोणता संदेश पाठवायचाय, याची त्यांना कल्पना आहे. विशिष्ट लोकसंख्येला आकर्षित करण्यासाठी ते पावले उचलत आहेत. त्यांना चुकीचे समजू नये. त्यांच्या कृती चांगल्या किंवा बरोबर आहेत, असा विचार आपण करू शकतो. मात्र, हे एक वेगळ्या प्रकारचे राजकारण आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले..मंदिर भेटीकडून जातींकडेलोकसभा प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी प्रमुख मंदिरांना भेटी दिल्या होत्या. काँग्रेसच्या सॉफ्ट हिंदुत्वाच्या या प्रयत्नावरही इराणी यांनी टीका केली. काँग्रेसला यातून मतदारांना आकर्षित करण्यात अपयश आले. त्यामुळे राहुल गांधी मतदारांना आकर्षित करण्यासाठी जातीच्या मुद्द्याकडे वळले, असेही स्मृती इराणी यांनी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.