चिमुरडयाचा रिक्षामध्ये अभ्यास, IAS अधिकाऱ्यानं शेयर केला व्हिडिओ

सोशल मीडियावर (social media) जगाच्या कानाकोपऱ्यातील वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात.
rikshaw boy video
rikshaw boy video
Updated on

मुंबई - सोशल मीडियावर (social media) जगाच्या कानाकोपऱ्यातील वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. यामुळे कुठे काय चालले आहे याचा अंदाज आपल्याला येतो. गेल्या काही दिवसांपूर्वी एका म्हशीनं कासवाला आपल्या शिंगाच्या साह्यानं उचलून जीवदान दिल्याची बातमी व्हाय़रल झाली होती. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. आताही असाच एक व्हिड़िओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक चिमुरडा रिक्षामध्ये (rikshaw) बसून अभ्यास करत असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (video viral on social media)

आयएएस अधिकारी अविनाश शरण (ias officer avinash sharan) यांनी आपल्या व्टिटर अकाउंटवरुन तो व्हिडिओ शेयर केला आहे. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तो व्हिडिओ पाहिल्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामध्ये अदम्य जिद्द असेल तर आपण कितीही मोठं संकट असेल त्याला गवसणी घालू शकतो. अशा आशयाची प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. आतापर्यत हजारो जणांनी तो व्हिडिओ पाहिला आहे. त्या चिमुरड्याला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

rikshaw boy video
Movie Review; एकदा थोडी घेतली तर बिघडलं कुठं?, सात बायकांचा 'झिम्मा'

त्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, लहान मुलाला आपला कोणी व्हिडिओ तयार करत आहे याचे जराही भान नाही. तो आपल्या अभ्यासामध्ये एकदम मग्न झाला आहे. आतापर्यत या व्हिडिओला सहा हजार लोकांनी लाईक्स केले आहे. तर शेकडो लोकांनी त्यावर कमेंट्सही केल्या आहेत. त्या अधिकाऱ्यानं या व्हिडिओला कॅप्शन देताना दुष्यंत कुमार यांची एक कविता पोस्ट केली आहे. त्या कवितेच्या ओळी अशा आहेत की....पंक्ति 'हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए.'

rikshaw boy video
Bollywood patriotic dialogues 'दुध मांगोगे तो खिर देंगे कश्मिर मागोंगे तो ...'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.