Noida's Society Rules Viral News : ग्रेटर नोएडाच्या सेक्टर Phi 2 मधील अपार्टमेंट मालकांच्या संघटनेने तेथील रहिवाशांना कॉमन एरिया किंवा पार्कमध्ये असताना त्यांच्या पोशाखाची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यासाठीचे खास परिपत्रकच त्यांनी सर्क्युलेट केले आहे.
हिमसागर अपार्टमेंटमध्ये संघटनेद्वारे 10 जून रोजी जारी केलेले परिपत्रकात रहिवाशांना त्यांच्या फ्लॅटच्या बाहेर "लुंगी आणि नायटी घालून" येण्यास मनाई केली आहे. काहींनी त्याचे स्वागत केले आहे तर काहींनी तीव्र टीका केली आहे.
टाइम्स ऑफ इंडियामध्ये दिलेल्या वृत्तानुसार संघटनेचे अध्यक्ष सीके कालरा यांनी सांगितले की, त्यांनी कोणताही भेदभाव केला नाही, परंतु कंपाऊंडमध्ये दररोज योगा करताना लोक "सैल कपडे" घालत असल्याच्या काही तक्रारी मिळाल्या. यामुळे इतर लोकांना अनकंफर्टेबल वाटले. त्यानंतर त्यांनी रहिवाशांना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची विनंती केली.
"काही दिवसांपूर्वी, काही महिलांनी लुंगी घालून योगासने करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाची तक्रार केली होती. सुरुवातीला आम्ही लोकांना तोंडी विनंती केली. नंतर असोसिएशनने एक परिपत्रक काढण्याचा निर्णय घेतला," कालरा म्हणाले.
परिपत्रकात असे लिहिले आहे की, "रहिवाशांना विनंती आहे की तुम्ही जेव्हा कधीही सोसायटीत फिरता तेव्हा तुम्ही तुमच्या वागण्यावर आणि पेहरावाकडे विशेष लक्ष द्यावे जेणेकरून तुमच्या वागण्यावर कोणाला आक्षेप घेण्याची संधी मिळू नये. तुमची मुले देखील यातून शिकतात. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, घरातील पोशाख असलेल्या लुंगी आणि नायटी घालून फिरू नका."
लुंगी आणि नायटी हे कॉमन कॅज्युअल किंवा रात्रीचे कपडे आहेत आणि उन्हाळ्याच्या महिन्यांत बरेच लोक पसंत करतात.
हिमसागरचे रहिवासी डॉ. यश वीर सिंग यांना परिपत्रकात कोणतीही अडचण दिसली नाही. "ते आमच्यावर कोणताही दंड ठोठावत नाहीत. लुंगी घालून कॉमन एरियात फिरताना मी कधीही पाहिले नाही, पण कदाचित ते कोणाचे पाहुणे असावेत. येथील रहिवासी बहुतेक शिस्तप्रिय आहेत," असं ते म्हणाले.
आणखी एक रहिवासी, पंकज, म्हणाले की त्यांना परिपत्रकाची माहिती नव्हती परंतु ते अनपेक्षित वाटले नाही. "पालक म्हणून, मला वाटते की ते माझ्या मुलांसाठी चांगले आहे. संघटनेने काहीही चुकीचे सांगितले नाही आणि मला वाटते की आपण त्याचा विचार केला पाहिजे".
परंतु आरडब्ल्यूए फेडरेशन्समध्ये मतांची तीव्र फूट पडली आहे. जीबी नगर जिल्हा विकास RWA ने या निर्णयाला दुजोरा दिला. त्याचे अध्यक्ष एनपी सिंग म्हणाले की, सार्वजनिक ठिकाणी "काही मर्यादा" पाळल्या पाहिजेत. "सोसायटी किंवा एखादे क्षेत्र यासह सार्वजनिक ठिकाणी, कॉमन एरीया, उद्याने इत्यादीं ठिकाणी लुंगी किंवा नायटीसारखे खराब-फिट केलेले सैल कपडे घालणे योग्य वाटत नाही".
केके जैन, फेडरेशन ऑफ नोएडा रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनचे (एफओएनआरडब्ल्यूए) सरचिटणीस, ज्यांचे सदस्य म्हणून 140 पेक्षा जास्त आरडब्ल्यूए आहेत, त्यांनी असे सांगितले की काही शालीनता राखली गेली पाहिजे, "आम्ही असे मानतो की प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य असले पाहिजे की, त्याला किंवा तिला पाहिजे ते कपडे परिधान करता यावे. ड्रेस त्या व्यक्तीच्या आवडीनुसार असावा."
ग्रेटर नोएडामधील सक्रिय नागरिकांच्या गटाचे आलोक सिंग म्हणाले, "प्रत्येकाला त्याच्या/तिच्या आवडीचा पोशाख घालण्यास मोकळीक असावी. परंतु समाजाचा एक सदस्य म्हणून, तत्कालिक वातावरणाची सामाजिक स्वीकार्यता लक्षात ठेवली पाहिजे."
नोएडा फेडरेशन ऑफ अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन (NOFAA) चे अध्यक्ष राजीव सिंग, ज्यांचे 60 पेक्षा जास्त सदस्य आहेत, म्हणाले की रहिवाशांच्या संघटना स्वतःहून असे नियम बनवू शकत नाहीत. "नागरिक समाजात ड्रेस कोडची व्याख्या करण्याचे मूळ वसाहतवादी मानसिकतेत आहे. आम्ही कोणत्याही विशिष्ट प्रकारचे कपडे लोकांना परिधान करण्यासाठी सांगू शकत नाही किंवा प्रतिबंधित करू शकत नाही."
"उलट, आम्ही लोकांच्या आवडीनिवडींचा आदर करणे आवश्यक आहे. पण, कोणत्याही विशिष्ट समुदायाच्या धार्मिक किंवा सांस्कृतिक भावना दुखावणार नाहीत अशी काळजी घेतली जाऊ शकते. कल्याणकारी संघटना स्वतःहून असे नियम बनवू शकत नाहीत. सुसंस्कृत जगात, आपण लोकांच्या भावना आणि त्यांच्या निवडींचा आदर केला पाहिजे," असंही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.