Software Engineer in Bengluru died age 51 shocking news : देशातील आयटी सीटी म्हणून ज्या राज्याचे जगभरामध्ये नाव घेतले जाते त्या बंगलोरची गोष्टच वेगळी आहे. दरवर्षी हजारो इंजिनिअर त्या राज्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयातून तयार होतात. तिथेच असलेल्या शेकडो कंपन्यांमध्ये काम करतात. अशावेळी मागेल तितका पगार, वाढत्या अपेक्षा यामुळे काही जीवघेण्या गोष्टीही घडताना दिसून येतात.
आता तर सोशल मीडियावर बंगलोरमध्ये झालेल्या त्या घटनेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले, एका तरुणानं आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यानं ज्याप्रकारे आत्महत्या केली ते ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. नैराश्य, मानसिक त्रास यासारख्या अनेक गोष्टींना वैतागून त्यानं उचलेल्या त्या टोकाच्या पावलामुळे नेटकऱ्यांनी त्याच्याप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. नेमकं काय झालं होतं हे आपण जाणून घेणार आहोत.
Also Read: सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...
त्या तरुणानं स्वताला संपविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले. त्यानं पहिल्यांदा नायट्रोजन सिलिंडर खरेदी केला. तो आपल्या कारमध्ये ठेवला. कार पूर्ण एका बेडशीटनं झाकून ठेवली. आणि स्वता पाठीमागील सीटवर जाऊन बसला. यानंतर मात्र त्यानं जे काही केले त्यामुळे त्याला जीव गमवावा लागला आहे. काहीही झालं तरी आपल्याला जगायचेच नाही अशी त्याची मानसिकता तयार झाली होती. त्यामुळे की काय त्यानं घेतलेला निर्णय त्याच्या जीवाशी आला.
तो तरुण स्वताला संपविण्यासाठी बेभान झाला होता. त्यानं रागाच्या भरात स्वताच्या तोंडाभोवती प्लॅस्टिकची पिशवी गुंडाळली. अशाप्रकारे गुदमरून त्यानं स्वताला संपवून टाकलं. सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल होताच अनेकांनी त्याच्याप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. आत्महत्या केलेल्या त्या तरुणाचे नाव ५१ वर्ष असून त्याचे नाव विजय कुमार असे आहे. तो त्याच्या कारच्या आत मृतावस्थेत आढळून आला. स्थानिकांना याविषयी माहिती कळताच त्यांनी पोलिसांना त्याबाबत तातडीनं सांगितलं.
कुटूंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय हा गेल्या काही दिवसांपासून एका गंभीर आजारानं त्रस्त होता. त्याला हदयविकाराचा त्रासही होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.