Soil Health Card Scheme : मोदी सरकारने आणलंय Soil हेल्थ कार्ड; जाणून घ्या मृदा हेल्थ कार्डचे फायदे

मातीचे आरोग्य चांगले राहावे आणि पिक चांगले यावे यासाठी सरकारकडून अनेक उपाय योजना अंमलात आणल्या जातात.
Soil Health Card Scheme
Soil Health Card SchemeSakal
Updated on

Soil Health Card Scheme : आज मृदादिन साजरा केला जात आहे. मातीचे आरोग्य चांगले राहावे आणि पिक चांगले यावे यासाठी सरकारकडून अनेक उपाय योजना अंमलात आणल्या जातात.

हेही वाचा : First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

Soil Health Card Scheme
World Soil Day : जमिनीचे आरोग्य बिघडले; अन् उत्पन्न घटले

आज आम्ही सरकारच्या अशाच एका योजनेबाबत माहिती सांगणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी त्याच्या शेतीतील माती सुपीक बनवू शकतो. या कार्डच्या माध्यमातून शेतकरी चांगले पीक घेऊन बक्कळ नफा मिळवू शकतात. मृदा आरोग्य कार्ड योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतातील मातीच्या गुणवत्तेच्या आधारे अनुकूल पिके घेण्यास मदत केली जाते. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ फेब्रुवारी २०१५ रोजी लाँच करण्यात आली आहे.

Soil Health Card Scheme
World soil day : तुम्हालाही माती खावीशी वाटतेय का ?

काय आहे मृदा आरोग्य कार्ड योजना?

मृदा आरोग्य कार्ड योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिलेल्या कार्डमध्ये शेतजमिनीच्या मातीच्या प्रकाराची माहिती मिळते. त्यामुळे शेतकरी त्यांच्या जमिनीच्या गुणवत्तेच्या आधारे पिकांची लागवड करून चांगली शेती करू शकतात. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीच्या गुणवत्तेनुसार तीन वर्षांतून एकदा मृदा आरोग्य कार्ड दिले जातात.

मृदा आरोग्य कार्ड योजनेचे उद्दिष्ट

सरकारने 2015 मध्ये मातीच्या गुणवत्तेनुसार पिके घेऊन उत्पादन क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने मृदा आरोग्य कार्ड योजना सुरू केली आहे. या कार्डमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढूण्यास तसेच खताच्या वापरामुळे जमिनीचा कस आणि समतोल राखण्यास चालना देण्याचा सरकारची योजना आहे. या कार्डच्या माध्यमातून शेतकरी कमी खर्चात जास्त उत्पादन घेऊ शकतात.

Soil Health Card Scheme
Soil Moisture टिकवण्यासाठी काय करावं आणि काय करू नये?

या योजनेंतर्गत देशातील शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे परीक्षण करून मृदा आरोग्य कार्ड देण्याबरोबरच शेतीनुसार पिकांची लागवड करण्याची सूचना केली जाते. तसेच जमिनीत कोणत्या गोष्टींचे प्रमाण किती आहे याबाबत माहिती सांगितली जाते. याशिवाय शेतकऱ्यांनी कोणत्या पिकासाठी किती आणि कोणते खत वापरावे याबाबत मार्गदर्शन केले जाते.

कसे काम करते मृदा हेल्थ कार्ड?

  • सर्व प्रथम अधिकारी शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे नमुने गोळा करतात.

  • यानंतर माती प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवली जाते.

  • मातीच्या नमुन्याची माहिती घेतल्यानंतर तपास पथक त्याचा दर्जा सांगतो.

  • जमिनीत काही कमतरता असल्यास ती सुधारण्यासाठी सूचना दिल्या जातात.

  • त्यानंतर हा अहवाल शेतकऱ्याच्या नावासह ऑनलाइन अपलोड केला जातो.

Soil Health Card Scheme
Swasthyam 2022 : ‘स्वास्थ्यम्’ का उपयुक्त?ध्यान, प्राणायाम व योगसाधनेविषयी जाणून घ्या सगळं

मृदा आरोग्य कार्डमध्ये दिली जाते ही माहिती

  1. मातीचे आरोग्य

  2. शेताची उत्पादक क्षमता

  3. पोषक घटकांची माहिती

  4. पाण्याचे प्रमाण उदा. ओलावा

  5. शेताच्या गुणवत्तेशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे यामध्ये देण्यात येतात. .

कसा करावा मृदा आरोग्य कार्डसाठी अर्ज?

  • सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाइटला (soilhealth.dac.gov.in) भेट द्या.

  • यानंतर होम पेजवर दिलेल्या लॉगिनच्या पर्यायावर क्लिक करा.

  • नवीन पेज उघडल्यावर तुमचे राज्य निवडून Continue वर क्लिक करा.

  • लॉगिन पेज उघडल्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन न्यू युजरच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

  • मागितलेले सर्व तपशील भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

  • नोंदणी केल्यानंतर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.

Soil Health Card Scheme
Swasthyam 2022 : मानसिक फिटनेस योगाच्या माध्यमातून कसा साधला जाऊ शकतो?

मृदा हेल्थ कार्ड कराल डाउनलोड?

  • अधिकृत वेबसाइटच्या (soilhealth.dac.gov.in) होम पेजवर, फार्मर कॉर्नरमध्ये मृदा हेल्थ कार्ड प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करा.

  • तुमचे राज्य निवडल्यानंतर जिल्हा, गाव, शेतकऱ्यांचे नाव यासंबंधीची माहिती भरा.

  • सर्व आवश्यक तपशील भरल्यानंतर सर्च बटणावर क्लिक करून मृदा हेल्थ कार्ड ओपन होईल. जे तुम्ही प्रिंट करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.