Crime News: उत्तर प्रदेशातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. आईची हत्या करणाऱ्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. हिमांशू असे आरोपी तरुणाचे नाव आहे. तो मूळचा बिहारमधील गोपालगंज येथील आहे.
हरियाणातील हिसारमध्ये त्याने आईची हत्या केली होती. हत्येनंतर त्याने मृतदेह सुटकेसमध्ये भरून ट्रेनने प्रयागराजला आणला. तो आपल्या आईचा मृतदेह संगमात टाकण्यासाठी आला होता. मात्र पोलिसांची नजर त्याच्यावर पडली आणि तो पकडला गेला.
उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये एक तरुण मोठी सुटकेस घेऊन फिरत होता. पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्याची चौकशी केली असता तो घाबरला. त्याचे सुटकेस बघितली असता पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह होता. हा मृतदेह त्याच्या आईचा असल्याचे हिमांशूने सांगितले. (Latest Marathi News)
प्रयागराज पोलीस उपायुक्त (शहर) दीपक भुकर याबाबत सविस्तर माहिती दिले. ते म्हणाले, हिमांशूने त्याची आई प्रतिमा देवी यांच्याकडे ५,००० रुपये मागितले होते. जे आईने देण्यास नकार दिला होता. यानंतर रागाच्या भरात हिमांशूने आईचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह एका सुटकेसमध्ये टाकून ट्रेनने प्रयागराजला पोहोचला.
हिमांशू सुटकेस घेऊन फिरत होता, ते पाहून पोलिसांना संशय आला आणि त्याची चौकशी केली. मात्र त्याला कोणतेही अचूक उत्तर देता आले नाही. अशा परिस्थितीत पोलिसांनी सुटकेसमध्ये काय आहे असे विचारले असता तो गोंधळला आणि घाबरला होता. (Crime News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.