माणुसकीला लाजवेल अशी बातमी गुजरातमधून समोर आली आहे. एका मुलाने आपल्याच आईची निर्दयी हत्या केली आहे. एवढेच नाही तर मुलाने आईची हत्या केल्याची स्टोरीही इन्स्टाग्रामवर अपलोड केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलालाही अटक केली आहे. पोलिसांनी स्वत: या प्रकरणी एफआयआर नोंदवला. तसेच महिलेच्या अंत्यसंस्काराचीही व्यवस्था केली.