Sonam Wangchuk : ऑल इज नॉट वेल...! खराखुरा 'रँचो' लडाखसाठी लढतोय; कडाक्याच्या थंडीत उपोषण सुरु

Sonam Wangchuk
Sonam Wangchuk
Updated on

लेह : लडाखच्या शिक्षण सुधारक आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी आजपासून पाच दिवसांचे उपोषण सुरू केले आहे. सोनम वांगचुक १८ हजार फूट उंचीवर असलेल्या खादुर्ंगला येथे उपोषण करणार आहेत. त्याठीकाणी सध्या तापमान मायनस ४० डिग्री सेल्सिअस आहे. काही दिवसांपूर्वी, वांगचुक यांनी एक व्हिडिओ शेअर करून देशभरातील लोकांना उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

बॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट '३ इडियट्स'मधील आमिर खानने साकारलेली रणछोडदास चंचड उर्फ ​​'रँचो' ही भूमिका सोनम वांगचुक यांच्यापासून प्रेरित होती. या चित्रपटातील 'ऑल इज वेल' हा डायलॉग खूप प्रसिद्ध होता. पण आज सोनम वांगचुक म्हणत आहे की 'ऑल इज नॉट वेल इन लडाख'.

हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखला भारतीय संविधानाच्या सहाव्या अनुसुचित सहभागी करण्याची मागणी सोनम वांगचुक यांनी केली आहे. सोनम वांगचुक यांनी रविवारी एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत त्यांनी केंद्राकडं ही मागणी केली होती. आपली मागणी मान्य न झाल्यास त्यांनी पाच दिवसांच्या आंदोलनाचा इशाराही दिला होता.

दरम्यान आजपासून त्यांचे उपोषण सुरु झाले आहे. वांगचुक यांनी यापूर्वी पंतप्रधान मोदींना आवाहन केलं होतं की, लडाखला वाचवा. कारण एका अभ्यासात असं म्हटलंय की, इथले सुमारे दोन तृतीयांश ग्लेशिअर संपण्याच्या मार्गावर आहे. यामुळं लडाखमधील मुळ जमाती, उद्योग नष्ट होणार आहेत.

Sonam Wangchuk
Shyam Manav : श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी, पुण्यात गुन्हा दाखल!

जिवंत राहिलो तर पुन्हा भेटू

सोनम वांगचुक यांनी आपल्या व्हिडिओत पंतप्रधान मोदी आणि शहा यांना आवाहन केलं होतं की, लडाखबाबत उच्चस्तरावर तातडीनं कार्यवाही करा. पंतप्रधानांना माझं आवाहन आहे की, लडाख आणि अन्य हिमालयीन क्षेत्रांना वाचवण्यासाठी ठोस पावलं उचलावीत. खादुर्ंगला इथं उपोषणादरम्यान मी वाचलो तर आपण पुन्हा भेटुयात.

Sonam Wangchuk
iNCOVACC : देशवासियांना प्रजासत्ताक दिनी मोठं गिफ्ट; कोरोनाची पहिली इंट्रानोजल लस लाँच

सोनम वांगचुक कोण आहेत?

सोनम वांगचुक यांचा जन्म १९६६ मध्ये झाला, ते एक मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. तसेच हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्स, लडाख (HIAL) याचे संचालक देखील आहेत. त्यांना सन २०१८ मध्ये मॅगेसेसे अॅवॉर्डही मिळाला आहे. २००९ मध्ये आलेल्या थ्री इडियट्स या सिनेमात आमिर खाननं साकारलेली भूमिका फुंगसुख वांगडू ही सोनम वांगचुक यांच्यावरच बेतलेली होती. वांगचुक यांनी लडाखमध्ये स्टुडंट्स एज्युकेशन अँड कल्चरल मुव्हमेंट ऑफ लडाक (SECMOL) बनवण्यासाठी ओळखले जातात.

Sonam Wangchuk
Pathaan: या 7 चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी केली होती 100 कोटींची कमाई, या यादीत पठाणचाही समावेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.