No Confidance Motion : राहुल संसदेत बोलत असताना 'आई' पाठीशी! भाषणावेळी सोनिया गांधी सतत करत होत्या मार्गदर्शन

Rahul And Sonia Gandhi : भाषण हे अचूक असले पाहिजे याची खात्री सोनिया गांधी करून घेत होत्या
rahul gandhi speech
rahul gandhi speechesakal
Updated on

Rahul And Sonia Gandhi : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात विरोधकांनी दुसरा अविश्वास ठराव आणला. यावेळी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी चर्चेत सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

मोदी सरकारवर हल्लाबोल करताना राहुल गांधी यांच्या पुढच्या रांगेत बसलेल्या त्यांच्या आई सोनिया गांधी या राहुल गांधी यांना सांकेतिक काहीतरी सूचना करत असल्याचे पाहायला मिळाले.

rahul gandhi speech
Delhi Murder : आधी ७० हजार रुपयात पत्नीला घेतले विकत नंतर तिचाच केला खून !

लोकसभेत भाषण करत असताना सोनिया गांधी या राहुल गांधी यांना अध्यक्ष्यांकडे बघून भाषण करा असे सांगताना दिसल्या. राहुल गांधी यांच्या संपूर्ण भाषणावेळी सोनिया गांधी आपले पुत्र राहुल गांधी यांना मार्गदर्शन करताना दिसून आल्या. त्यांचे भाषण हे अचूक असले पाहिजे याची खात्री त्या करून घेत होत्या.

rahul gandhi speech
Solapur Politics: आगामी लोकसभा निवडणूक महत्त्वाची असल्याने खासदारकीला हातात हात, आमदारकीला पायात पाय

राहुल गांधी हे देखील आपल्या आईचे ऐकत असल्याचे पाहायला मिळाले. सोनिया गांधी या राहुल गांधींना ज्या-ज्या सूचना करत होत्या त्या सूचनांचे पालन राहुल गांधी करत होते. राहुल गांधींच्या भाषणा वेळी विरोधकांनी गदारोळ सुरू केला. तेव्हा 'इंडिया' आघाडीतील घटक पक्षाचे खासदारही चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सोनिया गांधी यांच्या शेजारी बसलेले काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना आपली आक्रमकता वाढवण्याचे आवाहन सोनिया गांधी यांनी केले.

rahul gandhi speech
Narendra Modi on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर शेवटी नरेंद्र मोदींनी उत्तर दिलचं, युती तोडल्याच खापर शिवसेनेवरच फोडलं

सोनिया गांधींनी राहुल गांधींना हातातला फोटो दाखवायला सांगितला. नंतर तोच फोटो सोबत ठेवायला सांगितला. त्यानंतर राहुल यांनी पीएम मोदी आणि गौतम अदानी यांचा विमानात एकत्र बसलेला जुना फोटो दाखवला आणि सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमित शाह आणि गौतम अदानी या दोनच लोकांचे ऐकतात, जसे रावण मेघनाद आणि कुंभकर्णाचे ऐकायचा.

rahul gandhi speech
Narendra Modi : पंतप्रधानपदासाठी शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला डावललं; मोदींचं विधान

आपल्या भाषणात, मणिपूर हिंसाचाराचा संदर्भ देताना, राहुल यांनी त्यांची आई सोनिया गांधी यांचाही उल्लेख केला आणि ते म्हणाले, "माझी एक आई इथे सभागृहात बसली आहे. दुसरी आई,भारत माता, मणिपूरमध्ये तुम्ही (मोदी सरकारने) मारली. " ते म्हणाले की, केंद्र सरकारने ईशान्येकडील राज्याचे दोन भाग केले आहेत. भाजपचे लोक देशभक्त नाहीत, ते देशद्रोही आहेत, त्यांनी मणिपूरमध्ये भारताची हत्या केली आहे असा आरोप राहुल यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.