Sonia Gandhi : ''माझं लेकरु तुम्हाला सोपवत आहे... तो तुम्हाला निराश करणार नाही'', सोनिया गांधी भावुक

‘‘ गांधी कुटुंबाकडून मला जी शिकवण मिळाली तीच मी राहुल आणि प्रियांका यांना दिली. सर्वांचा आदर करा, एखाद्या कमकुवत घटकासाठी लढायची वेळ आली तर लढा. संघर्षाची तुमची पाळेमुळे आणि परंपरा या मजबूत आहेत. मी तुम्हाला माझा मुलगा सोपवित आहे. जसे तुम्ही मला आपले मानले तसेच राहुलला देखील आपले माना. राहुल तुम्हाला कधीच निराश करणार नाही.’’
sonia gandhi rahul gandhi
sonia gandhi rahul gandhiesakal
Updated on

Raebareli Lok sabha election 2024 : रायबरेली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल गांधी यांच्या प्रचारसभेसाठी सोनिया गांधींची उपस्थिती होती. यावेळी पुत्रासाठी सोनिया गांधी भावुक झाल्याचं बघायला मिळालं.

रायबरेलीमध्ये बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की, मी माझा मुलगा तुमच्या स्वाधीन करत आहे, तुम्ही जसं मला तुमचं म्हणून सांभाळलं तसं राहुलला सांभाळा. राहुल तुम्हाला निराश करणार नाही, याची मी खात्री देते, अशा भावना सोनिया गांधींनी व्यक्त केल्या.

sonia gandhi rahul gandhi
परराष्ट्र मंत्रालयाकडून लाओस, कम्बोडियाला जाणाऱ्या भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायझरी जारी; काय आहे कारण?

‘‘ गांधी कुटुंबाकडून मला जी शिकवण मिळाली तीच मी राहुल आणि प्रियांका यांना दिली. सर्वांचा आदर करा, एखाद्या कमकुवत घटकासाठी लढायची वेळ आली तर लढा. संघर्षाची तुमची पाळेमुळे आणि परंपरा या मजबूत आहेत. मी तुम्हाला माझा मुलगा सोपवित आहे. जसे तुम्ही मला आपले मानले तसेच राहुलला देखील आपले माना. राहुल तुम्हाला कधीच निराश करणार नाही,’’ असे भावुक उद्‍गार काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी काढले. त्या येथे आयोजित सभेत बोलत होत्या. राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव देखील या सभेमध्ये सहभागी झाले होते.

sonia gandhi rahul gandhi
Arvind Kejriwal: ईडीच्या कारवाईबाबत केजरीवालांचं पुढे काय होणार? सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला निकाल

पुढे बोलताना सोनिया म्हणाल्या, ‘‘बऱ्याच दिवसांनंतर मला तुमच्यात येण्याची संधी मिळाल्याने मी आनंदी आहे. खासदार या नात्याने मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली. ते माझ्यासाठी खूप मोठे भांडवल आहे. गेल्या शंभर वर्षांपासून आमच्या घराण्याची पाळेमुळे ही या मातीशी जोडल्या गेली आहेत. इंदिरा गांधी यांच्या मनात रायबरेलीसाठी वेगळे स्थान होते. त्यांचे तुमच्यावर अतिव प्रेम होते.’’ रायबरेली हा गांधी कुटुंबीयांचा गड मानला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.