नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष आपला १३७ वा स्थापना दिवस आज मंगळवारी (ता.२८) साजरा करित आहे. या निमित्त पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या, वे (भाजप) स्वतःला जागा देण्यासाठी इतिहासाचे पुनर्लेखन करित आहेत. त्यांचा इतिहासात सहभाग नव्हता. आपल्या संसदीय लोकशाहीतील सर्वोत्तम परंपरा जाणून-बुजून मोडले जात आहेत. या विनाशकारी शक्तींशी आम्ही लढू. सोनिया गांधी (Sonia Gandhi) पुढे म्हणाल्या, तिरस्कार आणि पूर्वाग्रहात अडकलेल्या विभाजनकारी विचार आणि ज्यांचा आपल्या स्वातंत्र्य आंदोलनात कोणताही सहभाग नव्हता. आता ती आपल्या समाजाच्या धर्मनिरपेक्ष समाजरचनेला हानी पोहोचवत आहेत.(Sonia Gandhi Speak On Congress Party Foundation Day, Said BJP Rewrite History Of Nation)
या दरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पक्ष स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ट्विटमध्ये ते म्हणतात, काँग्रेस तो पक्ष आहे जिने देशात लोकशाहीची स्थापना केली. आम्ही काँग्रेस आहोत, ज्या पक्षाने आमच्या देशात लोकशाहीचा स्थापना केली आणि आम्हाला या वारशाचा अभिमान आहे. काँग्रेस स्थापना दिनाच्या (Congress Foundation Day) शुभेच्छा!
स्थापना दिनी पडला झेंडा
भारतीय काँग्रेस पक्षाचा आज २८ डिसेंबर रोजी १३७ स्थापना दिन साजरा केला जात आहे. या प्रसंगी पक्ष अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यासह अनेक वरिष्ठ नेते काँग्रेस मुख्यालयात पोहोचले. सोनिया गांधी यांनी पक्ष मुख्यालयात जेव्हा ध्वजवंदनासाठी दोरी ओढली तेव्हा झेंडा खाली पडला. मात्र ध्वजवंदन न करता राष्ट्रगीत म्हणण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.