सोनियांचा मोदींना प्रश्न; ‘द्वेषपूर्ण भाषणाविरोधात’ भूमिका घेण्यापासून कोण रोखतंय?

Sonia Gandhi targets PM narendra Modi on Hate speech
Sonia Gandhi targets PM narendra Modi on Hate speechSonia Gandhi targets PM narendra Modi on Hate speech
Updated on

नवी दिल्ली : कट्टरवाद, द्वेष आणि विभाजन हे देशाचा पाया हलवत आहेत. तसेच समाजाचे नुकसान करीत आहेत. याची भरपाई करणे अशक्य आहे. असे काय आहे जे पंतप्रधान नरेंद्र मोदींना द्वेषपूर्ण भाषणाविरोधात उभे राहण्यापासून अडवत आहे, असा सवाल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (sonia gandhi) यांनी शनिवारी (ता. १६) केला. (Sonia Gandhi targets PM narendra Modi on Hate speech)

रामनवमीच्या मुहूर्तावर देशात अनेक ठिकाणी झालेला जातीय संघर्ष, हिजाब आणि अजानशी संबंधित वादाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी ही टिप्पणी केली आहे. सत्तेत असलेल्यांच्या विचारसरणीला विरोध करणारे सर्व मतभेद आणि मते निर्दयीपणे दाबली जातात. राजकीय विरोधकांना लक्ष्य केले जाते. भारतातील विविधतेचा स्वीकार करण्याबाबत पंतप्रधानांच्या बाजूने बरीच चर्चा होत आहे. परंतु, कटू वास्तव हे आहे की ज्या विविधतेने समाजाला शतकानुशतके परिभाषित केले आहे, त्याचा वापर राजवटीत आपल्याला विभाजित करण्यासाठी केला जात आहे, असे म्हणत सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

Sonia Gandhi targets PM narendra Modi on Hate speech
मुलीचा शोध घेण्यासाठी निघालेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार; तिघांना अटक

द्वेषी भाषण कुठूनही आले तरी पंतप्रधानांना (narendra modi) स्पष्टपणे आणि जाहीरपणे ‘द्वेषपूर्ण भाषण’ विरोधात भूमिका घेण्यापासून रोखणारे काय आहे, असा सवालही सोनिया गांधी यांनी विचारला. कॉर्पोरेट जगतातील काही धाडसी लोक कर्नाटकात जे काही चालले आहे त्याविरोधात बोलत आहेत यात आश्चर्य नाही. या धाडसी आवाजाच्या विरोधात सोशल मीडियावर अंदाजे प्रतिक्रिया उमटत आहेत. परंतु, चिंता खूप व्यापक आहे आणि अगदी वास्तविक आहेत, असेही सोनिया गांधी (sonia gandhi) म्हणाल्या.

मोदी सरकारने (narendra modi) १९४९ मध्ये संविधान सभेने राज्यघटना स्वीकारल्याच्या स्मरणार्थ २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्याची प्रथा सुरू केली आहे. पद्धतशीरपणे प्रत्येक संस्थेला भक्तिहीन करताना संविधानाचे पालन करण्यासारखे आहे. हा निव्वळ ढोंगीपणा आहे. देशाचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आणि तरुण प्रतिभेचा अधिक चांगला उपयोग करण्यासाठी आमच्या संसाधनांचा वापर करण्याऐवजी, काल्पनिक भूतकाळाच्या नावाखाली वर्तमान बदलण्याच्या प्रयत्नात वेळ आणि मौल्यवान मालमत्ता दोन्ही वापरली गेली, असेही सोनिया (sonia gandhi) गांधी म्हणाल्या.

Sonia Gandhi targets PM narendra Modi on Hate speech
आईमुळे मुलाने केली आत्महत्या; सुसाईट नोटमध्ये म्हणाला...

...हे तर पाया खराब करणे होय

सणांचे समान उत्सव, विविध धर्माच्या समुदायांमधील चांगले शेजारी संबंध, हे सर्व आपल्या समाजाचे प्राचीन काळापासून अभिमानास्पद वैशिष्ट्य आहे. संकुचित राजकीय फायद्यासाठी ते कमकुवत करणे म्हणजे भारतीय समाजाचा आणि राष्ट्रीयत्वाचा एकंदर आणि एकसंध पाया खराब करणे होय, असेही सोनिया गांधी यांनी इंग्रजी दैनिकात लिहिलेल्या लेखात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.