दादा राजकारणाच्या खेळपट्टीवर फटकेबाजी करणार? अमित शाह घेऊ शकतात भेट
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) गुरुवारी तीन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आले. अमित शाह यांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. शाह यांचा बंगाल दौरा पक्षश्रेष्ठींचे मनोबल वाढवण्यासाठी आहे. अमित शाह यांच्या भेटीबाबत असा अंदाज वर्तवला जात आहे की, ते शुक्रवारी टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची भेट घेऊ शकतात. यामुळे दादा राजकारणात येणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Sourav Ganguly ready to enter politics?)
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अमित शाह आणि सौरव गांगुली यांची बीसीसीआय अध्यक्षांच्या कोलकाता येथील निवासस्थानी भेट होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, सायंकाळी सहा वाजता अमित शाह (Amit Shah) व्हिक्टोरिया मेमोरियल येथे कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमात गांगुलीची (Sourav Ganguly) पत्नी डोना गांगुली परफॉर्म करणार आहेत.
कार्यक्रमानंतर अमित शाह हे सौरव गांगुलीला डोना गांगुलीसोबत त्यांच्या घरी भेटण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री (Amit Shah) शुक्रवारी सौरव गांगुलीच्या घरी जेवणही करू शकतात, असेही मानले जात आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वीही सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करेल अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु, तसे झाले नाही. आता भाजपची नजर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर आहे.
पक्षाच्या नेत्यांची भेट घेणार
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार शुक्रवारी कूचबिहारच्या तीन बिघा कॉरिडॉरवर बीएसएफच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुपारी गृहमंत्री कोलकाता येथे पोहोचून पक्षाच्या नेत्यांची भेट घेणार आहेत.
दादा बीसीसीआयचे अध्यक्ष
सौरभ गांगुली (Sourav Ganguly) ऑक्टोबर २०१९ मध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष बनले. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले होते. गांगुली यांच्यासह आणखी दोन व्यक्ती बिनविरोध निवडून आल्या. अमित शहा यांचा मुलगा जय शाह याला बीसीसीआयचे सचिव केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.